Join us

पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचे हप्ते उद्या जमा होणार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 8:37 AM

पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ कालावधीतील अनुक्रमे १८वा व पाचवा हप्ता मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पोहरादेवी, ता. मानोरा, जिल्हा वाशिम येथील समारंभात वितरीत होणार आहेत. 

पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ कालावधीतील अनुक्रमे १८वा व पाचवा हप्ता मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पोहरादेवी, ता. मानोरा, जिल्हा वाशिम येथील समारंभात वितरीत होणार आहेत. 

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे.

या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.

पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर,२०२४ अखेर राज्यातील जवळपास १.२० कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण १७ हप्त्यांमध्ये सुमारे रू. ३२,००० कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण ९१.४५ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. ६,९४९.६८ कोटी लाभ अदा करण्यात आला आहे.

मा. मंत्री कृषी महोदयांच्या निर्देशांनुसार जुन २०२३ पासून आयोजित गावपातळीवरील मोहिमांद्वारे पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची २० लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण ९१.५२ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. १,९००/- कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून पूर्वीच्या प्रलंबित हप्त्यासह रू. २,०००/- कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. २,०००/- तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. २,०००/- असा एकुण रू. ४,०००/- चा लाभ मा. पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते राज्यातील सुमारे ९१.५२ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल.

पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्यासाठी मा. श्री. धनंजय मुंडे, मंत्री कृषी यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीशेतीसरकारराज्य सरकारनरेंद्र मोदीकेंद्र सरकारकृषी योजना