गणेश पोळ
उसाचे क्षेत्र केळी या पिकाने घेतले आहे. पारंपरिक ऊस शेती सोडून इतर फळबागा दिसून येत आहेत. उसाला १८ महिने सांभाळण्यापेक्षा एका वर्षात या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतात. सध्या उसाचे ४० टक्के क्षेत्र या फळबागांनी व्यापले आहे.
पूर्वी उजनी धरणातील मुबलक पाण्यामुळे उजनी लाभ क्षेत्रातील, भीमा नदी, कालवा, इतर पाणीपुरवठा योजनेतून पाणी मुबलक झाल्याने अनेक शेतकरी मूळ ऊस शेती पिकवत होते.
उसाचे राजकारण आणि दर अनिश्चित यामुळे ऊस शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे वळलेला दिसत असून, थोडक्या पाण्यावर येणारी डाळिंब, पेरू, बोर या पिकाकडे लागवडी क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
उसाचे क्षेत्र केळी या पिकाने घेतले आहे. पारंपरिक ऊस शेती सोडून इतर फळ बागा दिसून येत आहेत. उसाला १८ महिने सांभाळण्यापेक्षा एका वर्षात या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतात.
सध्या उसाचे ४० टक्के क्षेत्र या फळबागांनी व्यापले आहे. डाळिंब व पेरू पिकाला चांगला दर मागील काही दिवसात मिळाला होता. तर केळी पिकालादेखील चांगला दर मिळत असल्याने केळी लागवडीकडे शेतकरी वळला.
कोल्ड स्टोरेज या भागात निर्माण झाल्याने टेंभुर्णी भागातील केळी परदेशात निर्यात होऊ लागली आहे. २०११-१२ पासून या भागातून केळी निर्यात होऊ लागली आहे.
पूर्वी खान्देश जळगाव हे केळीचे आगार होते. मात्र निर्यातक्षम केळी त्या ठिकाणी पिकू शकत नव्हती. सोलापूर जिल्ह्यातील वातावरणामुळे येथील शेतकरी निर्यातक्षम केळी पिकवू लागला आहे.
टेंभुर्णी व आसपासचा भागात १० किलोमीटर अंतरावर असलेल्या कंदर, माळशिरस या भागात मिळून १० चा वर केळी कोल्ड स्टोरेज असून याची क्षमता १७ हजार टन केळी स्टोरेज करण्याची क्षमता आहे.
केळी स्टोरेजमुळे पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा जास्त कामगार या ठिकाणी काम करत आहेत. यामुळे येथील अर्थकारणाला चालना मिळाली आहे.
एका स्टोरजला कमीत कमी १५० व जास्तीत जास्त ३०० टनांपर्यंत केळी आवक होते. एका स्टोरेजमधून ५ ते ६ कंटेनर निर्यात देखील होते. या केळी पिकांमुळे भारताचा बाहेर देखील टेंभुर्णीची ओळख निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातून टेंभुर्णी या भागातून सर्वात जास्त केळी निर्यात होते. व्यापाऱ्यांनी घेतलेला माल १ महिना ते तीन महिन्यांपर्यंत स्टोरेजमध्ये राहत असल्याने शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा होत आहे.
या व्यवसायात ३५० ते ४०० केळी व्यापारी असून, ती केळी कंपनी स्टोरेजला दिली जाते. बाहेरून माल आल्यानंतर नैसर्गिक तापमान देऊन कोल्ड केली जाते. त्यामुळे निर्यातक्षम केळी बाहेर देशात निर्यात होऊ शकते.
छोट्या शेतकऱ्याचा माल या कोल्ड स्टोरेजमध्ये राहावा म्हणून शासनाने प्रत्येक कोल्ड स्टोरेजला पॅक हाऊससुद्धा दिलेले आहे.
अधिक वाचा: ज्या दिवशी लिलाव त्याच दिवशी पट्टीचे पैसे; महाराष्ट्रात नावारूपाला येतंय हे कांद्याचे मार्केट