Join us

किसान सन्मान निधीसाठी मोहीम राबविण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 2:43 PM

पीएम किसान योजनेचा प्रस्तावित सोळावा हप्ता वितरित करण्यापूर्वी संपृक्तता मोहिमेची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी पूर्ण करण्याच्या सूचना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत संपृक्तता साध्य करण्यासाठी गावपातळीवर मोहीम राबविण्याचे यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा प्रस्तावित सोळावा हप्ता वितरित करण्यापूर्वी संपृक्तता मोहिमेची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी - योजनेची संपृक्तता साध्य करण्यासाठी - दोन टप्प्यात कामकाज करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील - बैंक खाते आधार संलग्न नसलेले, - ईकेवायसी प्रलंबित असलेले, - स्वयंनोंदणी लाभार्थीची मान्यता - प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी याबाबत प्राधान्याने कार्यवाही पूर्ण करावी.

आधार सीडिंगसाठी पोस्ट खाते, सामाईक सुविधा केंद्र व बैंक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे उपयोग करावा, तर ईकेवायसीसाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी सामाईक सुविधा केंद्र यांच्यामार्फत कामकाज पूर्ण करावे, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.

तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ७ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंद पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभाथ्यांचा शोध घेऊन त्यांची पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी करण्याबाबत कार्यवाही करावयाची आहे. त्यानंतर गाव, तालुका, जिल्ह्यामध्ये कोणतेही पात्र कुटुंब पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्याचे राहिले नसल्याचे प्रमाणपत्र कृषी आयुक्तालयास सादर करावे, अशा सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीपीक