कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची, नवीन प्रयोगांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यापीठांना केल्या.
कृषी विद्यापीठांमधील सकारात्मक घडामोडींची, नव्या प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगत कृषी खात्याकडून परिपत्रक जारी करून तात्काळ माहिती पोहोचवण्याचे विद्यापीठांना आदेश देण्यात आले आहेत.
नुकतीच कृषी विद्यापीठांमधील तज्ञांची धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली होती. यामध्ये खरीप हंगामात राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचे प्रकल्प राबवावेत असे निर्देश दिले होते.
शेतीतील दैनंदिन कामांसाठी मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने मजुरीचे दर शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे शेतामधील खत फवारणी कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे द्रोणद्वारे होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. कृषी विद्यापीठांमध्ये घडणाऱ्या शेती संबंधित विविध घडामोडींची तसेच नवीन प्रयोगांची माहिती माध्यमांना तातडीने देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.