Lokmat Agro >शेतशिवार > हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Integrated management of pod borer in gram chick pea | हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात.

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात.

शेअर :

Join us
Join usNext

रब्बी हरभऱ्याचे पीक हे काही ठिकाणी वाढीच्या तसेच बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. या दरम्यान घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढरकी होऊन वाळतात व गळून पडतात.

थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३० ४० घाट्यांचे नुकसान करते.

एकात्मिक व्यवस्थापन
-
घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामधे फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामधे येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकांचा जास्त वापर टाळावा.
- ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामधे बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रति हेक्टर २० पक्षी थांबे) तयार करून शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते.
- कामगंध सापळ्यांचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास कीड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
शेतकरी बंधुंनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्यावर (१ ते २ अळ्या प्रति मिटर ओळ) आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनाचाठी खालील दोन फवारण्या १० लिटर पाण्यात मिसळून कराव्या.

पहिली फवारणी (५० टक्के फुलोरावर असतांना)
निंबोळी अर्क ५ टक्के किंवा एच.ए.एन.पि.वि (१x१० पिओबो/मि.ली.) ५०० एल.ई./हे. किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मि.ली.
दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानंतर)
इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एस जि ३ ग्रॅम किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मि.ली. किंवा फ्ल्यूबेंडामाईड २० टक्के डब्ल्यूजी ५ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनिलिप्रोल १८.५ टक्के एस. मी, २.५ मि.ली.

डॉ. धनराज उंदिरवाडे, डॉ. प्रविण राठोड व श्री. गणेश वाघ
किटकशास्र विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला

Web Title: Integrated management of pod borer in gram chick pea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.