Join us

कोरडवाहू कापूस उत्पादकांसाठी सघन लागवड प्रणाली ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 10:42 AM

महाराष्ट्रात सदरचा सघन कापूस लागवड प्रकल्प कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्रीजद्वारे वर्धा व नागपूर जिल्ह्यात १००१ एकर कापूस क्षेत्रात राबविण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालय व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या साहाय्याने देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी विशेष पथदर्शी प्रकल्प सीआयसीआरच्या मार्गदर्शनात राबविले जात आहे. यात सघन कापूस लागवड प्रणालीचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्रात सदरचा सघन कापूस लागवड प्रकल्प कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्रीजद्वारे वर्धा व नागपूर जिल्ह्यात १००१ एकर कापूस क्षेत्रात राबविण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्यात ३०५ शेतकऱ्यांद्वारे ५१६ एकर मध्ये शेतकऱ्यांद्वारे ४८६ एकरमध्ये सघन कापूस लागवड पद्धत राबविले जात आहे. २४ ऑगस्ट २०२३ रोजी कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा जिल्हा वर्धा येथे प्रकल्पात भाग घेणाऱ्या शेकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी कापूस उत्पादन वाढीसाठी कोरडवाहू शेतीमध्ये सघन कापूस लागवड पद्धत फायद्याची आहे. सघन लागवड पद्धतीत झाडांची संख्या तीन पट करून जास्त उत्पादन कसे मिळू शकते याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना प्रती एकरी सहा पॅकेटचा बियानाचा खर्च तसेच वनस्पती वाढ नियामक व एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाची रक्कम डीबीटीव्दारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे.

कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी कापूस उत्पादन वाढीसाठी कोरडवाहू शेतकऱ्यांनी कपाशीसाठी सघन लागवड प्रणालीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. रामकृष्णन, डॉ. रचनापांडे, डॉ. राजकुमार रामटेके, डॉ. शैलेश गावंडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन अमित कावडे यांनी केले. आभार जगदीश नेरलवार यांनी मानले.

टॅग्स :कापूसनागपूरराज्य सरकारसरकारशेतीशेतकरीपीक