Join us

Interim Budget 2024: बागायतदारांसाठी महत्वाची तरतूद, 'या' मोहिमेसाठी २,२०० कोटी

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 27, 2024 2:01 PM

बागायती पिकांसाठी उत्कृष्ट लागवड साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात बागायतदारांसाठी महत्वाची तरतूद करण्यात आली आहे.  आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती अभियानासाठी २२०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

उच्च मुल्याच्या बागायती पिकांसाठी तसेच रोगमुक्त, दर्जेदार लागवड साहित्य विकसित करण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती कार्यक्रम सुरु केला आहे. बागायती पिकांसाठी उत्कृष्ट लागवड साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

सत्ताधारी भाजप सरकार सादर करत असलेला हा १२ वा अर्थसंकल्प आहे. निवडणूक वर्ष असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असेल. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकांनंतर पूर्ण अर्थसंकल्प अपेक्षित आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रूवारी रोजी सलग सहावे अर्थसंकल्पीय भाषण सादर करतील.

आर्थिक व्यवहास विभागाने (DEA) तसेच आशियाई विकास बँकेकडून मदत मिळवण्यासाठी शेतकरी कल्याण विभागाच्या या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सात पिकांसाठी ICAR संस्थांमध्ये स्वच्छ वनस्पती केंद्रे स्थापन करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग आणि आशियाई विकास बँक यांच्यात ऑक्टोबरमध्ये यासंदर्भा वाटाघाटी करण्यात आली होती. त्यात या प्रकल्पासाठी ९८ दशलक्ष डॉलर कर्ज सुरक्षित करण्याचे उदिष्ट आहे.

कृषीसाठी क्रेडीट वितरित

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थ मंत्रालयाने १८ कोटींहून अधिक रक्कम कृषी कर्ज म्हणून वितरित केली आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात क्रेडीटसाठी २० कोटींची रुपरेषा आखण्यात आली होती. त्यापैकी ९० टक्के रक्कम वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :फलोत्पादनअर्थसंकल्प 2024शेतकरी