Join us

Interim Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर राहणार विशेष लक्ष, यंदा कृषी क्षेत्राला काय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 27, 2024 12:16 PM

अंतरिम अर्थसंकल्पात शेतीसाठीची ९० टक्के रक्कम वळती, यंदा कृषी क्षेत्राला काय?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थ मंत्रालयाने १८ कोटींहून अधिक रक्कम कृषी कर्ज म्हणून वितरित केली आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात क्रेडीटसाठी २० कोटींची रुपरेषा आखण्यात आली होती. त्यापैकी ९० टक्के रक्कम वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सत्ताधारी भाजप सरकार सादर करत असलेला हा १२ वा अर्थसंकल्प आहे. निवडणूक वर्ष असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असेल. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकांनंतर पूर्ण अर्थसंकल्प अपेक्षित आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रूवारी रोजी सलग सहावे अर्थसंकल्पीय भाषण सादर करतील.

काय काय असणार कृषी क्षेत्रासाठी?

प्रजासत्ताक दिनाच्या संमारंभात यंदाचा अर्थसंकल्प तरूण, महिला, शेतकरी आणि गरीब या चार प्रमुख गटांसाठी असलेल्या धोरणांवर लक्ष केंद्रित करेल असे अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सांगितले आहे.अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला नेमके काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजनांमधील आर्थिक लाभात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; योजनांचा करणार विस्तार

■ अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळावे, यासाठी सरकार विशेष प्रयत्न करू शकते. कृषी कर्जाचे लक्ष २२ लाख कोटी रुपयांवरून २५ लाख कोटी रुपये वाढविले जाऊ शकते.

■ २० लाख कोटी रुपये कृषी कर्ज चालू आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३पर्यंत वितरित करण्यात आले आहे.

■ शेतकरी सन्मान योजनेत सध्या ६ हजार रुपये दरवर्षी मिळतात. ही रक्कम वाढविली जाण्याची शक्यता आहे.

■ २७,६६२ कोटी रुपयांची तरतूद कृषी मंत्रा- लयासाठी २०१३-१४ मध्ये होती. १.२५ लाख कोटी रुपयांवर ही तरतूद २०२३-२४च्या अर्थसंकल्पात केली होती.

■ सिंचन, कृषी विमा तसेच ग्रामीण रोजगा- राकडे सरकार विशेष लक्ष देऊ शकते. ग्रामीण क्षेत्रासाठी असलेल्या योजनांवरील खर्च वाढविण्याची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित आहे

टॅग्स :अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामनशेती क्षेत्रप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना