Lokmat Agro >शेतशिवार > इटलीतील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ चा समारोप

इटलीतील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ चा समारोप

International Year of Millet 2023 concluded at the headquarters of the Food and Agriculture Organization in Italy | इटलीतील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ चा समारोप

इटलीतील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ चा समारोप

अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) ने इटलीतील रोम शहरामधील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात २९ मार्च २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) २०२३ च्या समारोप समारंभाचे आयोजन केले होते.

अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) ने इटलीतील रोम शहरामधील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात २९ मार्च २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) २०२३ च्या समारोप समारंभाचे आयोजन केले होते.

शेअर :

Join us
Join usNext

अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) ने इटलीतील रोम शहरामधील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात २९ मार्च २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) २०२३ च्या समारोप समारंभाचे आयोजन केले होते. 

संमिश्र पद्धतीने आयोजित या उच्च-स्तरीय कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभाग घेतला होता. यामध्ये भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अतिरिक्त सचिव मनिंदर कौर द्विवेदी यांचाही समावेश होता.

यावेळी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अतिरिक्त सचिव मनिंदर कौर द्विवेदी यांनी, भरडधान्याचा प्रचार आणि स्वीकार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भारतातील विविध स्टार्ट-अप, उद्योग, शेतकरी उत्पादक संघटना तसेच भारताच्या भरभराट होत असलेल्या भरड धान्य परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

अन्न आणि कृषी संघटनेचे (FAO) महासंचालक डॉ. क्यू डोंग्यू यांनी या समारोप समारंभाच्या उद्घाटनापर भाषणात, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या भरड धान्याशी संबंधित उपक्रमांना पुढे नेण्याच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली तसेच सर्वांसाठी अन्न सुरक्षा आणि पोषण साध्य करण्यात भरडधान्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला.

नायजेरियाचे मंत्री तसेच फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरियाचे अन्न आणि कृषी संघटने (FAO) मधील स्थायी प्रतिनिधी यया अदिसा ओलायटन ओलानिरन यांनी भरड धान्याच्या आहारातील महत्त्वावर प्रकाश टाकला आणि नायजेरियातील शाश्वत कृषी पद्धतींमध्ये भरड धान्य लागवडीचा समावेश करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणांची माहिती दिली.

समारंभात त्यानंतर, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ अंतर्गत जगभरात भरडधान्याचा प्रचार आणि प्रभाव वाढवण्याच्या उद्देशाने जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये आयोजीत विविध प्रकारच्या उपक्रमांची आणि कार्यक्रमांची आकर्षक चित्रफीत उपस्थीतांना दाखविण्यात आली.

अन्न आणि कृषी संघटनेच्या उपमहासंचालक बेथ बेचडोल यांच्या समारोपीय भाषणाने समारंभाची सांगता झाली. बेचडोल यांनी २०२३ च्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ च्या यशस्वीतेसाठी सर्व सहभागींचे अतूट वचनबद्धता आणि केलेल्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आंतरराष्ट्रीय वर्षाच्या समाप्ती नंतरही प्रचारात गती टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

७० हून अधिक देशांनी पाठिंबा दर्शविलेल्या भारताच्या प्रस्तावानंतर, संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च २०२१ मध्ये भरलेल्या ७५ व्या अधिवेशनात, २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले होते. 

वर्षभर चाललेल्या या उत्सवाने भरडधान्याच्या सेवनाचे पौष्टिक आणि आरोग्यविषयक फायदे, प्रतिकूल आणि बदलत्या हवामान परिस्थितीत भरड धान्याची लागवड करण्यासाठी जमीनीची योग्यता तसेच उत्पादक आणि ग्राहकांसाठी शाश्वत बाजारपेठ संधी निर्माण करण्याच्या फायद्यांविषयी यशस्वीरित्या जागरूकता निर्माण केली आहे. 

समारोप समारंभाच्या रुपात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) २०२३ च्या यशाचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातून मिळालेल्या माहितीचा आढावा घेण्यासाठी तसेच भविष्यातील गुंतवणुकीसाठी प्राधान्यक्रम ओळखण्यासाठी, विशेषतः या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी आणि भरड धान्य मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला.

या कार्यक्रमात, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि ‘ग्लोबल सुपरफूड’ म्हणून त्याचा उदय होण्यासाठी भरड धान्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या अंतर्दृष्टीपूर्ण चर्चा आणि सादरीकरणांची मालिका पार पडली. 

भारतीय कृषी संशोधन परिषद-भारतीय भरडधान्य संशोधन संस्था (ICAR-IIMR) संचालक डॉ. सी तारा सत्यवती यांनी भरड धान्य क्षेत्रासाठी संशोधन आणि विकास या विषयावरील गोलमेज चर्चेत भारताच्या संशोधन आणि विकास प्रयत्नांबद्दल अंतर्दृष्टी सामायिक केली.

यावेळी जगभरातील भरड धान्य पोषणमूल्य वर्धित उत्पादनांचे प्रदर्शन तसेच थेट पाककृती प्रात्यक्षिकांचे विशेष प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

Web Title: International Year of Millet 2023 concluded at the headquarters of the Food and Agriculture Organization in Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.