हरभरा रबी हंगामातील एक महत्वपूर्ण कडधान्य पीक आहे. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या विविध कडधान्यांमध्ये सर्वात जास्त क्षेत्र हरभऱ्याचे असून त्या खालोखाल इतर कडधान्य पिकाचे क्षेत्र आहे. हरभरा झाडाचा पालापोचाळा, अवशेष जमीनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते व खत खर्चामध्ये कपात होते. हरभऱ्याचा बिवड चांगला होत असल्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना त्याचा निश्चितच फायदा होतो. उशिरा पेरणी केलेल्या हरभरा लागवड तंत्रज्ञानामधील काही महत्वपूर्ण बाबींचा उहापोह प्रस्तूत लेखात देत आहोत.
तंत्रज्ञानातील महत्वपूर्ण बाबी१) प्रमाणित, सुधारीत, रोग प्रतिबंधक बियाण्याचा वापर.२) पेरणी अगोदर उगवण शक्ती घरीच तपासून पहावी.३) घरचे बियाणे दर तीन वर्षांनी बदलावे.४) हरभरा बियाण्याला पेरणीपूर्वी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ४-५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.५) हरभरा बियाण्याला पेरणीपूर्वी जीवाणु संवर्धन रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो तसेच पीएसबी २५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे लावावे.६) ओलिताखालील हरभन्यास २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद + ३० किलो पालाश प्रति हेक्टरी पेरणी सोबत द्यावे.
अधिक वाचा: हरभरा पिकाचे सुधारित वाण कोणते?
पेरणीची वेळओलिताखालील हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरचा २ रा आठवडा ते नोव्हेंबर १५ पर्यंत करावी. यानंतर पेरणीस जसजसा उशीर होईल त्याप्रमाणे येणाऱ्या उत्पादनात घट येईल. जमिनीतील उपलब्ध ओलावा व मगदुराप्रमाणे हरभऱ्याची पेरणी लवकरात लवकर संपवावी.
बीज प्रक्रियाबुरशीजन्य रोगापासून संरक्षणाकरीता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ४-५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
जीवाणू संवर्धनाचा वापरबीज प्रक्रिया केल्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणु (पीएसबी) संवर्धनाची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे गुळाचे थंड द्रावण मिसळून बियाण्यास चोळावे व बियाणे सावलीत वाळवून लवकरात लवकर पेरणीकरीता वापरावे.
अधिक वाचा: हरभरा लागवड करण्यापूर्वी या बाबींचा अभ्यास करा
खत मात्रा माती परिक्षणावर आधारीत शिफारस केलेल्या खत मात्रेचा पिकाला २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद + ३० किलो पालाश प्रति हेक्टरी पेरणीसोबत द्यावे.
तण व्यवस्थापनहरभरा पीक पेरणीनंतर ४५ दिवसापर्यंत तणमुक्त ठेवावे. त्याकरीता आवश्यकतेनुसार निंदणी व डवरणी करावी.
ओलित व्यवस्थापन हरभरा पिकाला जमिनीच्या मगदूरानुसार ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पिकाची फुलोरा अवस्था, घाटे लागण्याची व घाट्यामधील दाणा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार याची दक्षता घ्यावी. स्प्रिंकलरव्दारे ओलित करण्यास हरकत नाही परंतू योग्य नियोजन करावे.
काबुली हरभरा लागवडीबाबत महत्वाच्या बाबी पीकेव्ही काबुली २ आणि काबुली ४ हे हरभऱ्याचे टपोऱ्या दाण्याचे वाण आहेत. टपोऱ्या दाण्याचा चांगला बाजारभाव मिळावा म्हणून दाणे जास्तीत जास्त टपोर राहून उत्पन्न जास्त मिळविण्याकरीता खालील बाबींचा अवलंब करावा.१) पेरणी शक्यतो ओलिताचे क्षेत्रात १५ नोव्हेंबरपूर्वी करावी. शक्यतो सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करावा.२) पेरणी जमिनीत योग्य ओल असतांनाच करावी. ओलावा कमी असल्यास प्रथम ओलीत करावे. वापसा आल्यावर पेरावे.३) पेरणी वरंब्याच्या दोन्ही बाजुला अर्ध्या उंचीवर करून ओलित करतांना सऱ्या पेरणीच्या खालच्या पातळीत भराव्या.४) स्प्रिंकलरव्दारे ओलीत करण्यास हरकत नाही. परंतू ओलिताव्दारे मोजके पाणी दिल्या जाईल याची काळजी घ्यावी.५) पीक सुमारे पेरणीनंतर ४५ ते ५० दिवस तणमुक्त असावे.६) परिपक्तेच्या काळात घाटे व पाने पिवळे पडत असतांना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त सुकण्यापूर्वी कापणी करावी.
डॉ. सुहास लांडे व डॉ. अर्चना थोरात कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला