Join us

Irrigation News : पश्चिम विदर्भातील सिंचित क्षेत्र किती; लागवड क्षेत्र किती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 4:56 PM

राज्यातील लागवडीलायक क्षेत्र किती आणि सिंचन क्षेत्र किती याची माहिती घेऊया. (Irrigation News)

राजरत्न सिरसाट

राज्यातील लागवडीलायक क्षेत्र २,१०,६२,००० हेक्टर असून ५४,९५,४८५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. निर्मित सिंचन क्षमतेची लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी २६.०९ टक्के आहे.

प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र हे ४२,११,३११ हेक्टर आहे. ही लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी १९.९९ टक्के आहे, यात तब्बल ६.१ टक्क्याचा फरक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

अकोला जिल्ह्यात लागवडीलायक क्षेत्र ४,५१,००० हेक्टर आहे, तर सिंचित क्षेत्र हे फक्त ४१,५६० हेक्टर आहे, यावरून सिंचित लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी फक्त ९.२१ टक्के आहे.

पश्चिम विदर्भात अकोला जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र ४,५१,००० हेक्टर आहे. सिंचित क्षेत्र हे फक्त ४१,५६० हेक्टर आहे, म्हणजे सिंचित लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी फक्त ९.२१ टक्के (तीच निर्मित सिंचन क्षेत्राची लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी १३.७८ आहे),

अमरावती जिल्ह्यात लागवडीलायक क्षेत्र ८,१४,००० हेक्टर आहे, तर सिंचित क्षेत्र हे फक्त ९४,६०० हेक्टर आहे, म्हणजे सिंचित क्षेत्राची लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी फक्त ११.६२ टक्के (१५.८३ टक्के) आहे.

कंसातील आकडे हे निर्मित सिंचन क्षेत्राची लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी आहे.

बुलढाणा जिल्ह्यात लागवडीलायक क्षेत्र ७,३६,००० हेक्टर आहे, तर सिंचित क्षेत्र हे फक्त ६४,९९० हेक्टर आहे, म्हणजे सिंचित क्षेत्राची लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी फक्त ८.८३ टक्के (१४.६३ टक्के) आहे.

वाशिम जिल्ह्यात लागवडीलायक क्षेत्र ४,०७,००० हेक्टर आहे, तर सिंचित क्षेत्र हे फक्त ३१,२७० हेक्टर आहे, म्हणजे सिंचित क्षेत्राची लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी फक्त ७.६ टक्के (११.७१ टक्के) आहे.

यवतमाळ जिल्ह्यात लागवडीलायक क्षेत्र ९,५३,००० हेक्टर आहे, तर सिंचित क्षेत्र हे फक्त ९७,९५० हेक्टर आहे, म्हणजे सिंचित क्षेत्राची लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी फक्त १०.२७ टक्के (१९.७० टक्के) आहे.

पश्चिम विदर्भातील सिंचित क्षेत्राची स्थिती चिंताजनक असून, अभ्यास केला असता यात अकोला जिल्ह्यात लागवडीलायक क्षेत्र ४,५१,००० हेक्टर आहे, तर सिंचित क्षेत्र हे फक्त ४१,५६० हेक्टर आहे, म्हणजे सिंचित क्षेत्राची लागवडीलायक क्षेत्राची टक्केवारी फक्त ९.२१ टक्के असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. -डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार,माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

टॅग्स :शेती क्षेत्रपाटबंधारे प्रकल्पविदर्भराज्य सरकारपाणीपीक