Lokmat Agro >शेतशिवार > तुमची जमीन निरोगी आहे का? तपासा माती परीक्षणातून

तुमची जमीन निरोगी आहे का? तपासा माती परीक्षणातून

Is your soil healthy? Check with a soil test | तुमची जमीन निरोगी आहे का? तपासा माती परीक्षणातून

तुमची जमीन निरोगी आहे का? तपासा माती परीक्षणातून

जमिनीची आरोग्य तपासणी महत्त्वाची, खतांच्या खर्चात होणार बचत

जमिनीची आरोग्य तपासणी महत्त्वाची, खतांच्या खर्चात होणार बचत

शेअर :

Join us
Join usNext

रासायनिक खतांच्या अमर्याद वापराने जमिनीचा पोत खराब होत आहे. याचा थेट असर पिकांच्या वाढीवर होऊन सरासरी उत्पादनात कमी येत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य तपासणी अर्थात माती परीक्षण किमान तीन वर्षांतून एकदा करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आता कृषी विभागाद्वारा सुविधा देखील देण्यात आलेली आहे.

माती तपासणीसाठी नमुने काळजीपूर्वक घेणे महत्त्वाचे आहे. काही दिवसात त्याचा अहवाल मिळतो. याद्वारे जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य कमी आहे. याची माहिती शेतकऱ्यांना मिळते व सेंद्रीय खत, शेणखताद्वारे जमिनीचा पोत सुधारण्यास वाव असतो व याद्वारे पिकांचे पोषण व वाढ होऊन उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे जमिनीची आरोग्य तपासणी किमान तीन वर्षांतून एकदा करणे महत्त्वाचे आहे.

माती परीक्षण कशासाठी?

खतांच्या बेसुमार वापराने जमिनीचा पोत पाठवा माती परीक्षणाला खराब होत आहे व जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढत आहे. याचा पिकांच्या पोषणासह वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतातील मातीचे परीक्षण केल्यास उपाययोजना करता येते.

माती परीक्षण कसे करावे?

पीक काढणीनंतर शेताच्या चारही बाजूला थोडा खड्डा करून त्यामधील माती गोळा करावी. ती परीक्षणासाठी पाठवावी, मातीचा नमुना काढण्यासाठी गावातील कृषी साहाय्यकाजवळून माहिती घ्यावी.

किती वर्षांनंतर करायला हवे माती परीक्षण ?

जमिनीतील विविध पोषक घटक पिकांना मिळतात; मात्र यामध्ये काही अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते व अनावश्यक घटकांचे प्रमाण वाढते. याचा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे तीन वर्षांतून एकदा तरी शेता मातीचे परीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

एकाच जमिनीतून सातत्याने तीच पिके घेतल्याने व रासायनिक खतांच्या अमर्याद वापराने जमिनीचा पोत खराब होतो. त्याममुळे शेतकऱ्यांनी जमिनीतील मातीचेच परीक्षण करणे उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर ठरते. - उज्ज्वल आगरकर, कृषी उपसंचालक 

 
किती दिवसांत मिळतो अहवाल ?

माती नमुने दिल्यानंतर महिनाभरात प्रयोगशाळेचा अहवाल मिळणे अपेक्षित आहे. त्यापूर्वीदेखील अहवाल मिळतो व यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य कमी आहेत, याची माहिती मिळते.

आता पोस्टामार्फतही पाठवा माती परीक्षणाला

■ शासनाच्या नव्या नियमानुसार आता पोस्टाद्वारेही माती परीक्षणाला पाठविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नमुने प्रयोगशाळेत पाठविणे सोयीचे होणार आहे.
■ माती परीक्षणाचा अहवालदेखील शेतकऱ्यांच्या मोबाइलवर पाठविण्याची सुविधा आहे. याद्वारे मातीचे आरोग्य कळणार आहे.
 

Web Title: Is your soil healthy? Check with a soil test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.