हिवाळ्यात बोरं, पेरू, आंबट फळे खाऊ नका, असा कुटुंबीयांचा लहान मुलांना नेहमीच सल्ला असतो. मात्र, बोरं, चिचा खाण्याचेही हिवाळ्याचेच दिवस असतात. कारण उन्हाळ्यात, पावसाळ्यात किंवा हवे वाटेल त्या हंगामात सगळीच फळे उपलब्ध असतात असे नाही. डॉक्टरांच्या मते हिवाळ्यासह तीनही ऋतूंत फळे खाणे शरीरासाठी उत्तम आहे. मात्र, थंडीचे प्रमाण जास्त असल्यास सर्रासपणे फळे खाण्याचे प्रमाण कमी ठेवावे. तसेच सकाळी, सायंकाळी फळे खाऊ नयेत. मोसंबी, चिकू, अननस, अंजीर अशी फळे शरीरात उष्णता निर्माण करतात, यामुळे आहारात या फळांचा कायम भरणा असावा.
किमान तापमान १५ अंशांवर
बीड शहरासह बहुतांश राज्यातील तापमान सध्याचे तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस एवढे आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल दिसत आहे. कधी प्रचंड ऊन तर कधी आभाळ दाटून येतं आणि सकाळच्या सुमारास कडाक्याची थंडीही जाणवत आहे.
फळांचे भाव काय?
मोसंबी ३० रु. किलो, केळी ३० रुपये डझन, सफरचंद १०० ते १२० रु. किलो, सीताफळ - ३० डझन, पपई २५ नग
आंबट फळे खाताना वातावरणाचा विचार करा हिवाळ्यात फळे खाण्याला बंधन नाही; मात्र, सकाळी, सायंकाळी फळे स्वाणे टाळावे. बोरं, चिकू, पेरू अशी फळे हिवाळ्यातच असतात. यामुळे ती हिवाळ्यातच खावी लागतात. मात्र, आंबट फळे स्वाताना वातावरणाचा विचार करावा. तसेच आरोग्य ठीक नसल्यास काही काळासाठी अशी फळे खाणे टाळावे. डॉ. अमित बिस्वास, आहारतज्ज्ञ, बीड
थंडीत कुठली फळे खाल?
■ अननस : अननस व चिकू ही फळे हिवाळ्यात खाण्याविषयी डॉक्टर सल्ला देतात. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते. अननस, चिकू शरीरात उष्णता निर्माण करतात.
■ अंजीर : अंजीर हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असून, हिवाळ्यात अंजीर खाल्यास याचा चांगला फायदा होतो.
■ मोसंबी : हिवाळ्यात संधीवाताचे प्रमाणे वाढते, या काळात मोसंबी खाल्यास संधीवाताचा त्रास संभवत नाही.
■ पपई : पपई खाल्ल्याने शरीरात हीट तयार होते. दरम्यान, या फळांच्या सेवनातून हिवाळ्यात आरोग्याची काळजी राखली जाऊ शकते.
बाजारसमितीत काय स्थिती?
सध्या अंजीर क्विंटलमागे ४ ते ८ हजाराला विकले जात आहे. अननसाला पुणे, मुंबई, नागपूर बाजारपेठेत क्विंटलमागे २५०० ते ४००० चा भाव मिळत आहे. केळीचा भाव घसरला असून १००० ते ४००० पर्यंत विक्री होत आहे.चिकूला क्विंटलमागे २ ते ४ हजार भाव मिळत आहे.