Join us

Jamin Mojani : एक हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त एका तासात; आलंय हे नवं तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:42 IST

दोन हेक्टरपर्यंतच्या जमीन मोजणीसाठी नव्या दरानुसार नियमितसाठी दोन हजार, तर तातडीच्या मोजणीसाठी आठ हजार रुपये आकारले जात आहेत. दोन हेक्टरच्या वरील दोन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी दोन हजार रुपये जादा मोजावे लागतात.

कोल्हापूर : रोव्हर पद्धतीमुळे एक हेक्टर  जमिनीची मोजणी आता एका तासात होत आहे. परिणामी प्रलंबित प्रकरणाची संख्या कमी झाली आहे.

मात्र, भूमी अभिलेख कार्यालयातील खाबूगिरीमुळे बिल्डरांच्या मोजणीला प्राधान्य दिले जाते आणि शेतकऱ्यांच्या मोजणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, मोजणीच्या दरातही दुपटीने वाढ झाल्याने गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. शेतीचे आकारमान लहान होत आहे. तुकडे पडत आहेत. शेतीच्या हद्दीवरून वाद निर्माण होत आहेत.

नागरीकरणामुळे शहरालगतच्या जमिनीचे भूखंड पाहून त्यावर नवीन इमारती, कॉम्प्लेक्स उभारली जात आहेत. यामुळे हद्द निश्चितीला महत्त्व आले आहे.

शहरालगतच्या शेतमोजणीचे अर्ज दर महिन्याला वाढत आहेत. पण, नव्या तंत्रज्ञानामुळे मोजणीची प्रक्रिया गतीने होत आहे, असे भूमी अभिलेख प्रशासनाचे म्हणणे आहे. 

तर तिप्पट किंवा पाच पट शुल्क१) दोन हेक्टरपर्यंतच्या जमीन मोजणीसाठी नव्या दरानुसार नियमितसाठी दोन हजार, तर तातडीच्या मोजणीसाठी आठ हजार रुपये आकारले जात आहेत.२) दोन हेक्टरच्या वरील दोन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी दोन हजार रुपये जादा मोजावे लागतात. अशा प्रकारे मोजणीचे दर तिप्पट, पाचपट वाढले आहेत.

एक हेक्टरची मोजणी तासाभरातरोव्हर पध्दतीमुळे रोव्हरची मोजणी एका तासात होत आहे. मोजणीची गती वाढली आहे. मात्र, रोव्हरची संख्या कमी आणि मोजणीची प्रकरणे अधिक असल्याने दर महिन्याला प्रकरणे प्रलंबित राहात आहेत.

शेतमोजणीचे नवे दर काय?

मोजणीचा प्रकारजुने दरनवीन दर
नियमित१,०००२,०००
तातडीची३,०००८,०००

मोजणी कशी होणार?महिन्याला मोजणीची सरासरी १,२०० ते १,३०० प्रकरणे दाखल होत आहेत. यंत्रणा कमी असल्याने दाखल सर्व प्रकरणे निर्गत होत नाहीत. वशिलेबाजीमुळे वरकमाईची प्रवृत्ती वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.

अधिक वाचा: Satbara Utara : ५० वर्षानंतर सातबारा उताऱ्यात झाले हे मोठे बदल; वाचा सविस्तर

टॅग्स :शेतीलँड रोव्हरशेतकरीसरकारराज्य सरकार