Lokmat Agro >शेतशिवार > Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू, काय आहे आजचा पाणीसाठा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू, काय आहे आजचा पाणीसाठा?

Jayakwadi Dam: Water is inflowing in Jayakwadi Dam, what is the water storage today? | Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू, काय आहे आजचा पाणीसाठा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू, काय आहे आजचा पाणीसाठा?

अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून किती पाणी आतापर्यंत देण्यात आले?

अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून किती पाणी आतापर्यंत देण्यात आले?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील धरणपातळीत वाढ होत आहे. अहमदनगर, नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून अंदाजे  ७.५५१ पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत ४.५७११ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आज मुळा धरणातून पाण्याची आवक सुरू आहे.जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे होते. 

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ८.३० च्या सुमारास जायकवाडी धरण ४३.६७ टक्के भरले होते. जायकवाडी धरणाचा जिवंत पाणीसाठा हा आज ९४८.१४ टीएमसी एवढा आहे. मागील महिन्यात याच दिवशी पाणीसाठा ९८.२९ टक्के पाणीसाठा होता.

नाशिकच्या धरणांमधून पाणी आता बंद झाले आहे. निळवंडेतून सुरू असणारा विसर्ग आज थांबेल. दोन्ही जिल्ह्यांमधील सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा कोटा संपला आहे.  ८.६० टीएमसी पाण्यापैकी बहुतांशी पाण्याचा विसर्ग झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत हा विसर्ग थांबेल.- हरिश्चंद्र चकोर, से.नि. अभियंता, जलसंपदा विभाग

Nashik : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्याची स्थिती काय? कोणत्या धरणात किती पाणी उपलब्ध? 

कोणत्या धरणातून किती पाणी सोडले?

गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या आदेशानुसार जायकवाडी धरणात नाशिक नगरच्या धरण समुहापासून पाणी सोडण्यात येत आहे. आज अंदाजे ७.५५१ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात आले. जायकवाडीत अंदाजे ५३ टक्क्यांपर्यंत पाण्याची आवक झाली आहे.

कुठल्या धरणातून किती पाणी 

  • मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून २.१० टीएमसी,
  • प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर)प्रकल्पातून ३.३६ टीएमसी,
  • गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), ०.५ टीएमसी,
  • गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी
  •  एकूण ८.६०३ टीएमसी 

Web Title: Jayakwadi Dam: Water is inflowing in Jayakwadi Dam, what is the water storage today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.