Join us

राज्यातील युवकांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळणार १ लाखाहून अधिक पगार; इथे करा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:08 IST

Jobs in Israel शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत राज्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत राज्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहायक या क्षेत्रात युवक-युवतींना रोजगाराची संधी आहे. याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

महाराष्ट्र इंटरनॅशनल, महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाचा एक अभिनव उपक्रम, राज्यातील कुशल तरुणांना जागतिक रोजगार संधींशी जोडण्याचे काम करते.

मासिक वेतन व इतर सुविधामेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही असणार आहे. पात्र उमेदवारांना एक लाख ३१ हजारांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

अशी होणार निवडइस्राईलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया होणार आहे. तसेच नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत येथील विभागाकडून केली जाणार आहे.

शैक्षणिक व इतर पात्रता१) भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक.२) जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएस्सी नर्सिंग, पोस्ट बीएस्सी नर्सिंगची पात्रता असणे आवश्यक आहे.३) भाषा : इंग्रजी चांगली/मूलभूत.४) वयोमर्यादा : २५-४५ वर्षे.५) लिंग : पुरुष/स्त्री.६) उंची/वजन : किमान ५ फूट/४५ किलो किंवा अधिक.

पासपोर्ट वैधता किमान ३ वर्षे

या संकेतस्थळावर करा नोंदणीराज्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी.

अधिक माहितीसाठी संपर्कजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे संपर्कासाठी माहिती पुस्तिका

टॅग्स :इस्रायलनोकरीभारतमहाराष्ट्रराज्य सरकारसरकारव्हिसापासपोर्ट