सोलापूर : उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात कांदा लागवड क्षेत्र अधिक अन् विमा भरलेले क्षेत्र फारच कमी आहे. मात्र, माढा, करमाळा व सांगोल्यासह इतर तालुक्यांत कांदा लागवड न करता विमा भरलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कांदा बोगस विम्याची जिल्ह्यातील ८ तालुक्यांत तपासणी होणार आहे.
कांदा लागवड न करताच पीक विमा भरणाऱ्या राज्यातील आठ जिल्ह्यांत सोलापूर जिल्हा सर्वात आघाडीवर आहे. जिल्ह्यात ५० हजार ४५ हेक्टर क्षेत्र हे कांदा लागवड न करता पीक विमा भरलेले आहे.
कृषी अधीक्षक कार्यालयाकडील कांदा लागवडीची आकडेवारी ३५ हजार ५९५ हेक्टर असताना ८५ हजार ६४३ हेक्टर कांदा क्षेत्राचा विमा भरला आहे. एकतर कांदा लागवड न करताच विमा भरणा केला आहे किंवा कांदा लागवड केला आहे.
मात्र, कृषी खात्याकडून त्याची नोंद घेतलेली नसावी, असाही प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, कांद्याचे बोगस क्षेत्र किती?, हे तपासणी झाल्यानंतर समजणार आहे.
जिल्ह्यात सोलापूर व ऑगस्टपर्यंत उत्तर सोलापूर, दक्षिण बार्शी तालुक्यात ६ कांदा लागवडीची नोंद १७ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. मात्र, पीक विमा ११ हजार १७० हेक्टर क्षेत्राचा भरला आहे. म्हणजे कांदा लागवड क्षेत्र अधिक व विमा भरणा क्षेत्र कमी असे चित्र असल्याने या तीन तालुक्यांत तपासणी होण्याची शक्यता
नाही.
तालुका | लागवड क्षेत्र | विमा क्षेत्र |
उ. सोलापूर | ५६३२ | २८६७ |
द. सोलापूर | ५९३९ | ५७८५ |
बार्शी | ५७५५ | २५१८ |
अक्कलकोट | ३९०६ | ६७७९ |
मोहोळ | २२३५ | ५६८१ |
माढा | ४४३७ | १९६९५ |
करमाळा | ३४५६ | १५७३४ |
पंढरपूर | १०२९ | ३०५५ |
सांगोला | २७१ | ७५२५ |
माळशिरस | ५६१ | ७०६५ |
मंगळवेढा | २३७३ | ८४५० |
एकूण | ३५५९५ | ८५३५३ |
कांदा लागवड क्षेत्र व विमा भरलेले क्षेत्र हे हेक्टरमध्ये आहे.
बोगस विमा क्षेत्राबाबत आदेश
कृषी आयुक्त कार्यालयाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत (६ ऑगस्ट) लागवड झालेल्या क्षेत्राचा विचार करून बोगस विमा क्षेत्र तपासणीचे आदेश दिले आहेत. २७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात १६३० हेक्टर कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढ्यात क्षेत्राची मोठी तफावत असल्याचे दिसत आहे.