Lokmat Agro >शेतशिवार > kapus kharedi : 'सीसीआय'ची खरेदी बंद होताच कापसाचे दर क्विंटलमागे कसे? वाचा सविस्तर

kapus kharedi : 'सीसीआय'ची खरेदी बंद होताच कापसाचे दर क्विंटलमागे कसे? वाचा सविस्तर

kapus kharedi : As the purchase of 'CCI' closes, how will the price of cotton per quintal be? Read in detail | kapus kharedi : 'सीसीआय'ची खरेदी बंद होताच कापसाचे दर क्विंटलमागे कसे? वाचा सविस्तर

kapus kharedi : 'सीसीआय'ची खरेदी बंद होताच कापसाचे दर क्विंटलमागे कसे? वाचा सविस्तर

kapus kharedi : उन्हाचा तडाखा वाढत आहे. घरात साठवलेला कापूस असुरक्षित आहे. अशातच 'सीसीआय'कडून (kapus kharedi) खरेदी बंद करण्यात आली. खासगी बाजारात कापसाला अपेक्षित दर मिळतोय ते वाचा सविस्तर.

kapus kharedi : उन्हाचा तडाखा वाढत आहे. घरात साठवलेला कापूस असुरक्षित आहे. अशातच 'सीसीआय'कडून (kapus kharedi) खरेदी बंद करण्यात आली. खासगी बाजारात कापसाला अपेक्षित दर मिळतोय ते वाचा सविस्तर.

शेअर :

Join us
Join usNext

Cotton Market : उन्हाचा तडाखा वाढत आहे. घरात साठवलेला कापूस असुरक्षित आहे. अशातच 'सीसीआय'कडून (Cotton Market) खरेदी बंद करण्यात आली. खासगी बाजारात चांगला दर मिळत नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. (kapus kharedi)

आर्णी तालुक्यात कपाशी लागवडीचे मोठे क्षेत्र आहे. परंतु, कापूस खरेदीसाठीची ((kapus kharedi)) यंत्रणा तोकडी आहे. खेडा खरेदीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. सरकारी खरेदीत कमालीची अनियमितता आली आहे. (Cotton Market)

तालुक्यात सीसीआयने २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत खरेदी (kapus kharedi) केली. १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणीच्या प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. यानंतरही शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक राहिला. (Cotton Market)

७९ हजार २४४ क्विंटल कापसाची खरेदी

७९ हजार २४४ क्विंटल कापसाची खरेदी (kapus kharedi) आर्णीत झाली. खासगी बाजारात व्यापाऱ्यांकडून दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लोंढा सीसीआयच्या खरेदी केंद्राकडे वाढला होता. (Cotton Market)

तांत्रिक अडचणी वाढल्या

* नोंदणी काळात तांत्रिक अडचणींची गर्दी झाली. परिणामी अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे.

* उन्हाळा सुरू झाला असल्याने आगीसारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.

* ग्रामीण भागात नोंदणी करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत. शहराच्या ठिकाणी येवून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

* यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांचा चुराडा होतो. या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

शेती खर्चात झाली वाढ

आर्णी येथे खरेदी केंद्रावर ७९ हजार २४४ क्विंटल कापूस खरेदी (kapus kharedi) झाला आहे. गरजेपोटी शेतकऱ्यांना कमी दरात कापसाची विक्री करावी लागत आहे.

शेतीसाठीच्या खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत उत्पादन येत नसल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घेतलेल्या कर्जाची परतफेडही ते करू शकत नाही. त्यामुळे ते सतत चिंतेत सावटात राहात आहे. मार्च महिना सुरू झाल्याने वसुलीसाठी बँकांचा शेतकऱ्यांमागे तगादा वाढला आहे.

कर्जासाठी तगादा वाढला
 
* शेतातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके निघाली आहेत. यातील काही शेतमाल विकला गेला आहे. हाती आलेला पैसा विविध कारणांसाठी खर्ची पडला आहे. आता लागवडीसाठी घेतलेला पैसा, साहित्य खरेदीची उधारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

* शेतकऱ्यांना घरात असलेला शेतमाल विकावा लागत आहे. यामध्ये त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांना माल विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

* शेतकऱ्यांची तूरही घरात आली आहे. या शेतमालालाही चांगला भाव मिळत नाही. दरवाढीच्या प्रतीक्षेत तुरीचे पोतेही घरात पडून आहेत. अधिक काळ हा माल घरात पडून राहिल्यास वजनात घट येवून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Hamibhav: सोयाबीन, तूर एमएसपीच्या आत, कायद्याची अंमलबजावणी केव्हा? वाचा सविस्तर

Web Title: kapus kharedi : As the purchase of 'CCI' closes, how will the price of cotton per quintal be? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.