Lokmat Agro >शेतशिवार > Kapus Kharedi: शेतकऱ्यांनो! कापूस नोंदणीची 'ही' आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर

Kapus Kharedi: शेतकऱ्यांनो! कापूस नोंदणीची 'ही' आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर

Kapus Kharedi : Farmers! 'This' is the last date of cotton registration Read details | Kapus Kharedi: शेतकऱ्यांनो! कापूस नोंदणीची 'ही' आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर

Kapus Kharedi: शेतकऱ्यांनो! कापूस नोंदणीची 'ही' आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर

Kapus Kharedi : मागील दोन-अडीच महिन्यांपासून बाजारपेठेत कापसाची आवक सुरू आहे. आता कापूस खरेदी ही शेवटच्या टप्पावर आली आहे. त्यामुळे आता कापसाची नोंदणी करण्यासाठी शेवटची तारिख जाहीर करण्यात आली आहे.

Kapus Kharedi : मागील दोन-अडीच महिन्यांपासून बाजारपेठेत कापसाची आवक सुरू आहे. आता कापूस खरेदी ही शेवटच्या टप्पावर आली आहे. त्यामुळे आता कापसाची नोंदणी करण्यासाठी शेवटची तारिख जाहीर करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kapus Kharedi : मागच्या दोन-अडीच महिन्यांपासून बाजारपेठेतकापूस येणे सुरु झाले आहे. आजमितीस शेवटचा टप्पा असून कापूस खरेदी (Kapus Kharedi) ही सुरुच आहे.

कापसाची (Cotton) आवक कमी झालेली पाहून 'सीसीआय' (CCI) ने कापूस नोंदणीसाठी १५ मार्च ही शेवटची तारीख जाहीर केली आहे.

तेव्हा शेतकऱ्यांनी सीसीआयच्या (CCI) सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) वतीने करण्यात आले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी कापसाची (Cotton) लागवड मोठ्या प्रमाणात केली होती.

मागच्या दोन-अडीच महिन्यांपासून कापूस (Cotton) बाजारात येणे सुरु झाले आहे. काही कारणास्तव मध्यंतरी कापूस खरेदी (Kapus Kharedi) करणे बंद झाली होती. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूचितही केले होते.

सद्यस्थितीत कापसाची (Cotton) आवक झाली असून शेतकऱ्यांची उन्हाळी कामे सुरु झाली आहेत. सर्व बाजू लक्षात घेऊन 'सीसीआय' कार्यालयाने कापूस नोंदणीसाठी अंतिम तारीख १५ मार्च २०२५ दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 'सीसीआय'(CCI) कार्यालयाच्या सूचनांचे पालन करावे व कापूस नोंदणीची तारीख लक्षात ठेवावी. १५ मार्चनंतर कापूस नोंदणी होणार नाही. - नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: अकोला, मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

Web Title: Kapus Kharedi : Farmers! 'This' is the last date of cotton registration Read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.