Lokmat Agro >शेतशिवार > कडधान्यांचे आगर असलेल्या आष्टी तालुक्यातून करडई, सुर्यफुलाचे क्षेत्र हद्दपार!

कडधान्यांचे आगर असलेल्या आष्टी तालुक्यातून करडई, सुर्यफुलाचे क्षेत्र हद्दपार!

Kardai, sunflowers area expelled from Ashti taluka, which is agar of pulses! | कडधान्यांचे आगर असलेल्या आष्टी तालुक्यातून करडई, सुर्यफुलाचे क्षेत्र हद्दपार!

कडधान्यांचे आगर असलेल्या आष्टी तालुक्यातून करडई, सुर्यफुलाचे क्षेत्र हद्दपार!

सात वर्षांत कसलाच झाला नाही पेरा 

सात वर्षांत कसलाच झाला नाही पेरा 

शेअर :

Join us
Join usNext

नितीन कांबळे 

तेल बियांसाठी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असल्याने लागवड देखील चांगली असायची. शेतकऱ्यांना त्या पिकाची आवड होती. यातुन मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध होत होता. पण काळाच्या ओघात आणि हंगामी पिके घेऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याची पिके घेण्याकडे शेतकरी वळत आहे.

ज्यामुळे करडई, सुर्यफुल या तेल बिया पिंकाचा पेरा आष्टी तालुक्यातुन हद्दपार झाला असुन सात वर्षांत कसलाच पेरा झाला नसल्याची नोंद तालुका कृषी कार्यालयाच्या दप्तरी आहे. 

मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात काही वर्षापुर्वी करडई, सुर्यफुल या पिकाचा पेरा चांगला होता. पण नंतर शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अवगत झाल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि या पिकांना शेतातुन हद्दपार केले.

काही वर्षापुर्वी सुर्यफुलचा पाच हजार हेक्टर क्षेत्रावर तर करडई चा पाचशे हेक्टर क्षेत्रावर पेरा होता. पण मागील सात वर्षांपासून करडई साठी काढणीची अडचण व सुर्यफुल इतर पिकांना अन्न द्रव देत नसल्याने त्याचा देखील पेरा झाला नाही. त्यामुळे इतर पिकाच्या तुलनेत तालुक्यातुन करडई व सुर्यफुल हद्दपार झाले आहे.

याबाबत आष्टी येथील तालूका कृषी अधिकारी गोरख तरटे यांना विचारले असता ते म्हणाले की, तालुक्यात पाच सात वर्षापासून करडई व सुर्यफुल पिकाचा पेरा झाला नसल्याचे लोकमतला सांगितले. 

मराठवाड्यात उत्पादित होणारी विविध कडधान्य

तूर,मूग,उडीद,वाटाणा,मसूर,कुळीथ,मटकी,चवळी,सोयाबीन, 

या कडधान्यात हे जीवनसत्व आढळून येतात

२१-२५ टक्के प्रथिन, ५८-६४ टक्के कार्बोहायड्रेट, १.५ टक्के वसा, कॅल्शियम
, फॉस्फोरिक, ब१ जीवनसत्त्व मिळतात.

हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत

Web Title: Kardai, sunflowers area expelled from Ashti taluka, which is agar of pulses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.