Lokmat Agro >शेतशिवार > Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ

Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ

Karj Mukti Yojana : Benefit to heirs of deceased farmers who pay regular loan | Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ

Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबविली जात आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबविली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबविली जात आहे.

मात्र, त्यापूर्वीच ८ हजार २७९ मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देता येत नव्हता. आता या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही बँकांकडे वारसा नोंद केल्यास लाभ मिळेल.

१८ ते २६ सप्टेंबरदरम्यान संबंधितांना बँकांकडे वारसाची नोंद करता येईल. राज्य सरकारने २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. त्या अंतर्गत हा लाभ मिळणार आहे.

१८ सप्टेंबरपर्यंत मोहिमेला मुदतवाढ
• राज्य सरकारने राबविलेल्या मोहिमेत राज्यातील ३३ हजार १६६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याचे दिसून आले होते.
• अशा शेतकऱ्यांसाठी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली.
• यात १० सप्टेंबरअखेर १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या मोहिमेला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Karj Mukti Yojana : Benefit to heirs of deceased farmers who pay regular loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.