Lokmat Agro >शेतशिवार > Karj Mukti Yojana : आधार बँकेला जोडले अन् मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ

Karj Mukti Yojana : आधार बँकेला जोडले अन् मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ

Karj Mukti Yojana : Linked to Aadhaar Bank and got 50 thousand benefit of debt relief scheme | Karj Mukti Yojana : आधार बँकेला जोडले अन् मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ

Karj Mukti Yojana : आधार बँकेला जोडले अन् मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ

mahatma phule karj mukti yojana नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला.

mahatma phule karj mukti yojana नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला.

शेअर :

Join us
Join usNext

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

ही एकूण रक्कम ४६ कोटी ७० लाख रुपये असून, सर्वाधिक ८२९ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. राज्य सरकारने २०१९ मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली.

अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी आधार संलग्न बैंक खाते बंधनकारक करण्यात आले होते.

मात्र, ऑगस्ट अखेर ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याचे आढळल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारने १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली होती.

सर्वाधिक शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील
ही मुदत संपल्यानंतर या योजनेंर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४६ कोटी ७० लाख रक्कम राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ८२९ शेतकऱ्यांना ३ कोटी ५२ लाख, जळगाव जिल्ह्यातील ७२९ शेतकऱ्यांना ३ कोटी ७ लाख तर नाशिक जिल्ह्यातील ७१३ शेतकऱ्यांना ३ कोटी ५४ लाख रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

आजवर ५३१० कोटींचा लाभ
-
जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
- या योजनेमध्ये २०१७-१८, २०१८-१९, २२०१९-२० २०१९-२० या या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षांत बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेली आहे, अशा एकूण १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत एकूण ५ हजार ३१० कोटी रकमेचा लाभ देण्यात आला आहे, असेही तावरे यांनी सांगितले.

Web Title: Karj Mukti Yojana : Linked to Aadhaar Bank and got 50 thousand benefit of debt relief scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.