Lokmat Agro >शेतशिवार > Karjamukti Yojna : कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहन लाभासाठी आधार प्रमाणीकरणास मुदतवाढ

Karjamukti Yojna : कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहन लाभासाठी आधार प्रमाणीकरणास मुदतवाढ

Karjamukti Yojna : Extension of Aadhaar Verification for Incentive Benefit of loan Waiver Yojna | Karjamukti Yojna : कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहन लाभासाठी आधार प्रमाणीकरणास मुदतवाढ

Karjamukti Yojna : कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहन लाभासाठी आधार प्रमाणीकरणास मुदतवाढ

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र, काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते.

अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी यासाठी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती.

राज्यात या काळात ३३ हजार १६६ शेतकऱ्यांपैकी केवळ १६ हजार ८२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण केल्याचे स्पष्ट झाले आहेप्रामाणिकपणे कर्जफेड करूनही या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणताही लाभ देण्यात येत नव्हता. यासाठी राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर केली.

१२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात होती मुभा
शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी आधार संलग्न बँक खाते बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे आधार संलग्न बँक खाते नसल्याने प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारने १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात आधार प्रमाणीकरण करण्याची मुभा दिली होती.

- राज्यात असे ३१ हजार १६६ शेतकरी होते. मात्र, या कालावधीत केवळ १६ हजार ८२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण केले आहे.
- अजूनही १६ हजार ३५५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. राज्यस्तरावर ही संख्या मोठी असल्याने या योजनेला आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहेत.
- त्यामुळे आता या काळामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आधार प्रमाणीकरण करून प्रोत्साहनपर निधीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी स्पष्ट केले.

आधार प्रमाणीकरण न केलेले जिल्हानिहाय शेतकरी
पुणे - ६५१
ठाणे - ६४
पालघर - १४०
रायगड १७४
रत्नागिरी - ६३७
सिंधुदुर्ग - २२४
नाशिक - ४८४
धुळे - २२९
नंदुरबार - १४५
जळगाव - १०५३
नगर - ७०६
सोलापूर - २६०
कोल्हापूर - १४२७
सांगली - ४४६
सातारा - ५३७
संभाजीनगर - ३९४
जालना - ४३०
परभणी - १३२
हिंगोली - १२७
लातूर - ९९३
धाराशिव - १९५८
बीड - २२६
नांदेड - ८७२
अमरावती - २३४
अकोला - ११९
वाशिम - १६१
बुलढाणा - १००
यवतमाळ - १३०३
नागपूर - ४८३
वर्धा - २०९
चंद्रपूर - ३२४
भंडारा - ६८१
गडचिरोली - १७५
गोंदिया - २४७
एकूण - १६,३४५

Web Title: Karjamukti Yojna : Extension of Aadhaar Verification for Incentive Benefit of loan Waiver Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.