पुणे : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र, काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते.
अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी यासाठी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती.
राज्यात या काळात ३३ हजार १६६ शेतकऱ्यांपैकी केवळ १६ हजार ८२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण केल्याचे स्पष्ट झाले आहेप्रामाणिकपणे कर्जफेड करूनही या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणताही लाभ देण्यात येत नव्हता. यासाठी राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर केली.
१२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात होती मुभाशेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी आधार संलग्न बँक खाते बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे आधार संलग्न बँक खाते नसल्याने प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारने १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात आधार प्रमाणीकरण करण्याची मुभा दिली होती.
- राज्यात असे ३१ हजार १६६ शेतकरी होते. मात्र, या कालावधीत केवळ १६ हजार ८२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण केले आहे.- अजूनही १६ हजार ३५५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. राज्यस्तरावर ही संख्या मोठी असल्याने या योजनेला आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहेत.- त्यामुळे आता या काळामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आधार प्रमाणीकरण करून प्रोत्साहनपर निधीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी स्पष्ट केले.
आधार प्रमाणीकरण न केलेले जिल्हानिहाय शेतकरीपुणे - ६५१ठाणे - ६४पालघर - १४०रायगड १७४रत्नागिरी - ६३७सिंधुदुर्ग - २२४नाशिक - ४८४धुळे - २२९नंदुरबार - १४५जळगाव - १०५३नगर - ७०६सोलापूर - २६०कोल्हापूर - १४२७सांगली - ४४६सातारा - ५३७संभाजीनगर - ३९४जालना - ४३०परभणी - १३२हिंगोली - १२७लातूर - ९९३धाराशिव - १९५८बीड - २२६नांदेड - ८७२अमरावती - २३४अकोला - ११९वाशिम - १६१बुलढाणा - १००यवतमाळ - १३०३नागपूर - ४८३वर्धा - २०९चंद्रपूर - ३२४भंडारा - ६८१गडचिरोली - १७५गोंदिया - २४७एकूण - १६,३४५