Lokmat Agro >शेतशिवार > सेंद्रीय बीजोत्पादनातून शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणाऱ्या करुणा फुटाणे यांचे निधन

सेंद्रीय बीजोत्पादनातून शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणाऱ्या करुणा फुटाणे यांचे निधन

Karuna Phutane, a self-sufficient farmer through organic seed production, passed away | सेंद्रीय बीजोत्पादनातून शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणाऱ्या करुणा फुटाणे यांचे निधन

सेंद्रीय बीजोत्पादनातून शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणाऱ्या करुणा फुटाणे यांचे निधन

विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्येवर काम करणाऱ्या तसेच विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या  ग्रामसेवा मंडळाचा ऐतिहासिक वारसा चालवणाऱ्या आणि अग्रणी सेंद्रिय ...

विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्येवर काम करणाऱ्या तसेच विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या  ग्रामसेवा मंडळाचा ऐतिहासिक वारसा चालवणाऱ्या आणि अग्रणी सेंद्रिय ...

शेअर :

Join us
Join usNext

विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्येवर काम करणाऱ्या तसेच विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या  ग्रामसेवा मंडळाचा ऐतिहासिक वारसा चालवणाऱ्या आणि अग्रणी सेंद्रिय शेतकरी करुणा फुटाणे यांचे आज पहाटे निधन झाले. रक्तदाब वाढल्यामुळे वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.  

त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ व सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव फुटाणे, मुले विनय व चिन्मय, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आचार्य विनोबा भावे यांचे अनुयायी, प्रसिद्ध परंधाम प्रकाशनचे प्रकाशक दिवंगत रणजीतभाई देसाई यांच्या त्या कन्या होत.

देशी शुद्ध बियाणे, सेंद्रिय शेतीच्या तत्वांचे पालन करत वर्धा आणि नागपूरला जोडणाऱ्या गोपुरी गावात बीजोत्पादन करत शेतकऱ्याला समकालीन संघर्षात करुणा फुटाणे यांनी साथ दिली. महिला सक्षमीकरण, कृषी उद्योजकता, गोशाळा, तेलबियांचे सेंद्रिय बीजोत्पादन आणि शाश्वत शेती करत शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वयाच्या चौथ्या वर्षांपासून लग्नापर्यंत त्या विनोबांसोबत राहिल्या. लग्नानंतर काही वर्षांनी शेंदूर, आरवला भागात शेती करायला सुरुवात केली. २००९ साली गरम सेवा मंडळाचं काम बघायला सुरुवात केली.  गांधीजींनी दिलेल्या खादीचं योगदान पुन्हा एकदा जिवंत करण्याचं त्याचं ध्येय होतं. खेड्यातल्या शेतकऱ्याला रोजगार देण्यासोबत सेंद्रीय शेती त्यांनी केली.  कापूस पिकणाऱ्या आपल्या भागातील शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा २५% कमी करत बियाणं उत्पादन वाढवण्यावर भर देत हमीभाव मिळवून त्याचं जीवनमान सुधारायला मदत करण्यात त्याचं यश होतं." अशी प्रतिक्रिया विनय फुटणे यांनी दिली. 

Web Title: Karuna Phutane, a self-sufficient farmer through organic seed production, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.