Join us

काथ्या गव्हाला जीआय मानांकन, या प्रदेशातील मानांकन मिळणारे हे पहिलेच कृषी उत्पादन

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 02, 2024 11:02 AM

या गव्हाची ख्याती काय? कोणत्या गुणधर्मांमुळे मिळाला जीआय टॅग?

काथ्या गहू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशी गव्हाला भौगोलिक संकेत देण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशात पिकणारा हा देशी गहू आहे. शेती उत्पादनात मिळालेला हा पहिला GI टॅग असल्याचे सोमवारी सांगण्यात आले.

बुंदेलखंडात पिकणाऱ्या या गव्हाला काथ्या गहू किंवा डुरम गहु असेही म्हणतात. या भागात हा गहू प्रसिद्ध असून त्याच्या पौष्टीक गुणधर्मासह ग्लूटेनमुक्त असल्याने हा गहु निरोगी समजला जातो. या गव्हाच्या उत्पादनासाठी कमीत कमी पाण्याची गरज असून कठोर हवामानात हे पीक घेता येते.

बुंदेलखंडात पहिल्यांदाच एका कृषी उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाले असून यामुळे या भागातील शेतकरी समृद्ध होण्यास मदत मिळेल. तसेच गहू उत्पादनात येणाऱ्या काळात चांगल्या बियाणांच्या जाती मिळतील असे सांगण्यात येत आहे.

पाण्यासाठी भटकंती, त्यात गव्हासारखे पीक

बुंदेलखंड हा उत्तरप्रदेशातील कमी पाण्याचा भाग. भीषण उन्हाळा, उष्ण तापमानात या प्रदेशात पाण्याासाठी नागरिकांना दूरदूरपर्यंत भटकंती करावी लागते.अनेकदर पाण्याअभावी या भागातील लोकांना स्थलांतरही करावे लागले आहे. अशा प्रांतात काथ्या गव्हाला जीआय मानांकन मिळणे ही घटना महत्वाची मानली जात आहे.

टॅग्स :गहूउत्तर प्रदेशशेतकरी