Pune : किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) खात्यांमधील अडकलेल्या कर्जाचा आकडा वाढत असून, या कर्जात शेतकरी अडकले जात आहेत. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, चार वर्षांत प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता व्यावसायिक बँकांच्या किसान क्रेडिट कार्ड खात्यांत एनपीएमध्ये ४२% वाढ झाली आहे.
मार्च २०२१ अखेर ही रक्कम ६८,५४७ कोटी रुपये होती, जी डिसेंबर २०२४ अखेर ९७,५४३ कोटी रुपये झाली आहे. हवामानाचा फटका, मुदत माहिती नसणे, वैयक्तिक गरजांमुळे पैसे भरण्यास होणारा विलंब आणि बँकांची कमकुवत कर्ज वसुली यामुळे एनपीए वाढत आहे.
केसीसी खात्यांचे गणितआर्थिक वर्ष थकबाकी एनपीए२०२१-२२ ४.७६ ८४ हजार ६३७२०२२-२३ ५.१८ ९० हजार ८३२२०२३-२४ ५.७५ ९३ हजार ३७०२०२४-२५ ५.९१ ९७ हजार ५४३