जयेश निरपळ
यंदाही खरीप हंगामातील पिकांसाठी एक रुपयात पीकविमा भरण्याची सोय राज्य शासनाने केली आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांचे सातबारा, बँक पासबुक व आधारकार्डवर एकच नाव असावे, ही अट घातली आहे. यावर्षी ही नवी अट नावात काहीअंशी बदल असणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीतील संकटाने नुकसान झाल्यास बळीराजाला भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात येते. यात लाखो शेतकरी सहभागी होतात. एक रुपयांत पीकविम्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याने साडेचार लाख शेतकऱ्यांचे साडेअकरा लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यामळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते.
दरवर्षी एक जुलैपासून पीकविमा भरण्यास सुरुवात होते. साधारण जुलै अखेरपर्यंत पीकविमा भरण्याचा कालावधी असतो. मात्र यावर्षी मे महिन्यात काही जिल्ह्यात पाऊस पडला तर ४ जनपासन दमदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. लवकर पाऊस सुरू झाल्याने पीकविमा भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यावर्षी सातबारा उतारा, बैंक पासबुक व आधार कार्डवर एकच नाव असावे, ही अट घालण्यात आली आहे.
पिकांचे ७० टक्के नुकसान झाल्यावर एका हेक्टरसाठी मिळणारी रक्कम (रुपयांत)
ज्वारी - ३१०५० | तूर - ३६८०२ |
बाजरी - २७६०० | कापूस - ५९८०० |
सोयाबीन ५६३५० | कांदा - ८१४२२ |
मूग २४१५० | मका - ३५५९८ |
उडीद २४१५० |
शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नावात बदलाच्या संदभनि प्रस्ताव आल्यास सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी सदरील प्रस्ताव तहसील कार्यालयात न पाठवता त्यांच्या स्तरावर त्वरित निर्णय घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. अपवाद व्यक्तीचे नाव, पतीचे वडिलांचे किंवा आडनाव नाव पूर्णपणे बदल असल्यास केवळ असे प्रस्ताव तहसीलकडे पाठवण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहे. - सतीश सोनी, तहसीलदार, गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर.
१५ जुलैपर्यंत करता येणार अर्ज
सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन विमा उतरविण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी. जे. जायभाये यांनी केले आहे.
सातबारामधील नावातील व इतर चुका मध्ये जिल्हाधिकारी व संबंधित मंत्र्यांकडे मागणी केली होती. प्रशासनाने याची वेळेत दखल घेऊन कारवाई केली असती तर शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला नसता. -राहुल ढोले, शेतकरी बचाव कृती समिती गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर.
हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान