Join us

Kharif Cultivation Maharashtra: राज्यातील खरीप पेरणी कुठवर आली? वाचा विभागनिहाय पेरण्यांचा अपडेट

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 18, 2024 12:33 PM

Kharif Cultivation Maharashtra: जून महिना अर्धा संपला आहे. राज्यात खरीप पेरण्यांची काय स्थिती?

राज्यात मान्सूनला सुरुवात झाली असून जून महिना अर्धा संपला आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्यांना (Kharif Cultivation Maharashtra) सुरुवात केली आहे. काहीजण पावसाच्या मोठ्या सरीसाठी थांबल्याचे चित्र दिसत असून राज्यात ५१ हजार ७४३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी याच सुमारास त्या ८० हजार २७७ हेक्टरवर झाल्या होत्या.

महाराष्ट्रात मान्सूनने (Maharashtra Monsoon) काही विभागात ओढ दिली असून मागील देान दिवसांपासून विदर्भात नैऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विदर्भात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. इतर विभागात खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे.

वाचा विभागनिहाय खरीप पेरण्या

  • कोकणात भात पेरण्याांना सुरुवात झाली असून सिंधुदुर्ग जिल्हयात १९४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होत असून मागील वर्षीच्या तुलनेत ही पेरणी अधिक असल्याचे कृषी विभगाच्या अहवालातून समोर येत आहे.
  • नाशिक विभगात ३८ हजार ९८५ हेक्टरवर खरीप पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी ६४०७३ हेक्टरवर याच सुमारास पेरण्या झाल्या होत्या.
  • कोल्हापूर विभागात मागील वर्षीच्या तुलनेत अधिक पेरणी झालेली दिसते. मागील वर्षी ही पेरणी ६ हजार ६४९ एवढी होती. यंदा ती १० हजार ३२२ हेक्टरपर्यंत झाली आहे.
  • छ. संभाजीनगर विभागात यंदा १२३० हेक्टरवर खरीपाच्या प्रत्यक्ष पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी याच सुमारास विभागात ११९३ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.
  • राज्यात गळीतधान्ये, कापसासह इतर खरीप पिकांची एकूण ०.३६ टक्के पेरणी झाली.

जाणून घ्या राज्यातील सरासरी व प्रत्यक्ष पीकपेरणी

तृणधान्ये-सरासरी पेरणी क्षेत्र- ३४ लाख ७० हजार २७९ हेक्टरप्रत्यक्ष पेरणी- १० हजार ७४५ हेक्टर

कडधान्ये- सरासरी पेरणी क्षेत्र- २१ लाख ३८ हाजर ५७१ हेक्टरप्रत्यक्ष पेरणी क्षेत्र- ५६८ हे.

अन्नधान्ये-

सरासरी- ५६ लाख ८ जारा८५० हे.प्रत्यक्ष पेरणी- ११३१३ हे

गळीतधान्ये-

सरासरी- ४३ लाख ९२ हजार ३४० हेप्रत्यक्ष पेरणी- ३८९ हे

कापूस-

सरासरी- ४२ लाख़ हजार १२८ हेप्रत्यक्ष पेरणी- ४० हजार ४१ हे

एकूण खरीप पेरणी-

सरासरी - १४, २०, २३१८ हेप्रत्यक्ष पेरणी- ५१ हजार ७४३ हे

टॅग्स :खरीपपेरणीलागवड, मशागत