Lokmat Agro >शेतशिवार > यंदा खरीप कांदा लागवड ४० टक्क्याने घटली

यंदा खरीप कांदा लागवड ४० टक्क्याने घटली

Kharif onion cultivation has decreased by 40 percent this year | यंदा खरीप कांदा लागवड ४० टक्क्याने घटली

यंदा खरीप कांदा लागवड ४० टक्क्याने घटली

मागील वर्षी जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली होती. यावर्षी मात्र पावसाअभावी कांदा लागवड क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत १६ हजार २७४ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली होती. यावर्षी मात्र पावसाअभावी कांदा लागवड क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत १६ हजार २७४ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

साडेसाती पाठ सोडायला तयार नसून यावर्षी मात्र पावसाअभावी कांदा लागवडी क्षेत्रात मोठी घट आली. असून जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ४० टक्के कांदा लागवडीत घट झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली होती. यावर्षी मात्र पावसाअभावी कांदा लागवड क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत १६ हजार २७४ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली आहे.

कांदा लागवडीत चांदवड, येवला, मालेगाव तालुके आघाडीवर आहेत. अजूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने कांदा लागवडीत खोळंबा निर्माण झाला असून, अनेक शेतकऱ्यांना बियाणे टाकण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने रोपवाटिका तयार झालेल्या नाही, पर्यायाने खरीप कांदा लागवडीत घट होत असून शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची आशा आहे. दरवर्षी पोळा होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवडीला वेग येत असतो. या लागवडीसाठी जिल्हा दरवर्षी आघाडीवर असतो.

मात्र मागच्या वर्षी अतिवृष्टीने कामकाज विस्कळीत झाले होते तर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान व पावसाने दिलेला खंड यामुळे लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. २२ सप्टेंबरअखेर सरासरीच्या तुलनेत लागवड कमी झाली आहे. असून, ६० ते ६२ टक्के लागवड आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे हंगाम लांबणीवर गेला असून बाजारातील संभाव्य आवक लांबणीवर जाणार आहे.

- यंदा जून, जुलै महिन्यात थोड्याफार झालेल्या पावसावर तसेच विहिरीत उपलब्ध पाण्यावर शेतकन्यांनी कांदा बियाणे टाकून रोपवाटिका तयार केल्या.
- चांदवड, येवला व देवळा तालुक्यात अडचणी आल्या. पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांची लागवडीसाठी हिम्मत केलेली नाही. जिल्ह्यात मागील वर्षी या दिवसात २७ हजार हेक्टरवर कांदा लागवड झालेली होती.

येवला तालुक्यात आजपर्यंत चार हजार तीनशे चाळीस हेक्टरवर कांदा लागवड झालेली असून, समाधानकारक पाऊस नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा लागवड अत्यल्प आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध असलेल्या शेततळे व विहिरीच्या आधारे कांदा लागवड केलेली आहे. - शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी

Web Title: Kharif onion cultivation has decreased by 40 percent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.