Join us

Kharif Pik Vima : गेल्या वर्षीची खरीपातील नुकसानभरपाई तीन दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 9:56 AM

आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे १ हजार ९२७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे १ हजार ९२७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या तीन दिवसांत ही रक्कम नुकसानभरपाईसाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. यामुळे सहा जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षीच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला कंत्राट देण्यात आले होते.

या सहाही जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाईचे दावे ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने बीड पॅटर्ननुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे आवश्यक होते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून तसेच कृषी विभागाकडूनही राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता.

७ हजार ६२१ कोटींच्या भरपाईला मंजुरी- गेल्या खरीप हंगामात राज्यात एकूण सुमारे ७ हजार ६२१ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. राज्यात पंतप्रधान खरीप पीक विमा योजना बीड पॅटर्ननुसार राबविण्यात येते.ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानभरपाई असल्यास त्या ठिकाणी ११० टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई विमा कंपनी भरते व त्यापुढील नुकसानभरपाई राज्य सरकार देते.- या तत्त्वानुसार गेल्या खरीप हंगामातील मंजूर ७ हजार ६२१ कोटी रुपयांपैकी विमा कंपन्यांमार्फत ५ हजार ४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होते. उर्वरित शिल्लक नुकसानभरपाईपैकी १ हजार ९२७ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप प्रलंबित होते.

खात्यात पैसे होणार जमाया प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ६५६ कोटी, जळगावमधील ४७० कोटी, नगरमधील ७१३ कोटी, सोलापूरमधील २.६६ कोटी साताऱ्यामधील २७.७३ कोटी व चंद्रपूर ५८.९० कोटी प्रलंबित होते. त्यानुसार राज्य सरकारकडून ही प्रलंबित रक्कम १ हजार ९२७ कोटी मंजूर केले असून, ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

ही रक्कम येत्या तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येत आहे. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे

टॅग्स :पीक विमापीकखरीपसरकारराज्य सरकारबीडशेतकरीशेतीनाशिक