पूर्वी पाऊस (Rain) आला की, आधी शेतात नारळ फोडून धरणीची पूजा करून नंतर लागवड, पेरणीच्या कामाला सुरुवात केली जायची. मात्र वाढलेले यांत्रिकरण आधुनिकता यात हे सर्व कालबाह्य झालं. (kharif)
गावोगावी एका कॉलवर क्षणात ट्रॅक्टर (Tractor) शेतात येऊ लागल्याने आता घरोघरी बैल जोड देखील दिसत नाही. सर्ज्या राज्याच्या घागरमाळींचा आवाज येत नाही.
मात्र पूर्वी जेव्हा घरोघरी बैल जोड असायची तेव्हा उन्हाळ्याच्या शेवटी बैलांना अधिकचा खुराक दिला जायचा ज्याचा हेतु होता की येणार्या हंगामात या बैलांनी अधिकची मेहनत करावी. तसेच या जीवांना आपण आधार दिला तर या शेतातून उत्पादित चार्यावर पोट भरत हे आपल्याला उत्पन्न घेण्यात मदत करतील.
अलीकडे हे सर्व दुरावत असताना आता नवीन पिढी हंगाम पूर्व शेत पूजा देखील करतांना आढळून नाही.
काय होती शेत पूजण्याची प्रथा?
शेतात चांगली ओळ निर्माण झाली की, बियाण्यांची पेरणी करताना, लागवड करताना आनंदी उत्साही मनाने लागवड पेरणी करावी.
शेतात वाद घालू नये, हिंसा करू नये, पशुधनाला आराम देत काम करावं उगीचच त्या मुक्या जिवांच्या पाठीवर मार देत राबून घेऊ नये. अशी भावना पूर्वी धोतर, गांधी टोपी, फेटा घालणार्या कारभारी व कपाळभर कुंकवाचा मळवट असणार्या लुगड्यातील कारभारणीची असायची.
ज्या मागे कारण असायचे ते म्हणजे या मातीतून या हंगामातून आपले पोट भरते, घर खर्च भागतो. तेव्हा या मातीत धान पेरताना वादविवाद नको म्हणून प्रसंगी या मंडळींचा मोठा सुर ऐकू यायचा.
यास्तव पाऊस पडला की देवाचे आभार मानत जीवात जीव आला म्हणणारी ही मंडळी, हंगामाच्या सुरूवातीला धरणीची पूजा करून नारळ फोडून शेतात पाय ठेवायची. ज्यामागे वेगवेगळ्या धारणा होत्या.
हेही वाचा - Success Story दोन एकर केशर आंबा बागेतून उच्चशिक्षित तरुणाला ८ लाखांचे उत्पन्न