Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Seed On Subsidy शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे; वाचा कुठे करायचा अर्ज

Kharif Seed On Subsidy शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे; वाचा कुठे करायचा अर्ज

Kharif Seed On Subsidy Farmers will get seeds on subsidy; Read where to apply | Kharif Seed On Subsidy शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे; वाचा कुठे करायचा अर्ज

Kharif Seed On Subsidy शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे; वाचा कुठे करायचा अर्ज

अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाने केले आवाहन

अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाने केले आवाहन

शेअर :

Join us
Join usNext

खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. शेतकरी मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करण्यात व्यस्त आहेत. पाऊस पडताच पेरणीची लगबग सुरू होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या बियाणांचे नियोजन शेतकरी करीत आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका कृषी विभागाने विविध पिकांचे बियाणे वाटप करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र कृषी विभागामार्फत पिक प्रात्यक्षिकांतर्गत व प्रमाणित बियाणे अंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियाणांचे वितरण करण्यात येते.

त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. पीक प्रात्यक्षिकमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना एका एकरासाठी लागणारे बियाणे मोफत मिळणार आहेत, तर प्रमाणित बियाणे वितरण योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्ज केलेल्या क्षेत्रानुसार जास्तीत जास्त ५ एकर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे ५० टक्के अनुदानावर मिळणार आहेत

येथे करावे अर्ज

शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन महाडीबीटीच्या mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला लागणाऱ्या बियाणांचा अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जदार शेतकऱ्यांना जूनच्या पहिला किंवा दुसऱ्या आठवड्याअखेर बियाणांचे वितरण केले जाईल. पोर्टलवर सातबारा, आठ अ, बैंक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे.

हेही वाचा - Success Story दोन एकर केशर आंबा बागेतून उच्चशिक्षित तरुणाला ८ लाखांचे उत्पन्न

Web Title: Kharif Seed On Subsidy Farmers will get seeds on subsidy; Read where to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.