Lokmat Agro >शेतशिवार > Kharif sowing: खरीप हंगामाला होतेय सुरुवात, कापसासह ५ पिकांसाठी करा या वाणांची निवड

Kharif sowing: खरीप हंगामाला होतेय सुरुवात, कापसासह ५ पिकांसाठी करा या वाणांची निवड

Kharif sowing: As Kharif season begins, select these varieties for 5 crops including cotton | Kharif sowing: खरीप हंगामाला होतेय सुरुवात, कापसासह ५ पिकांसाठी करा या वाणांची निवड

Kharif sowing: खरीप हंगामाला होतेय सुरुवात, कापसासह ५ पिकांसाठी करा या वाणांची निवड

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने केली या तूर, मुग, भुईमूग, उडीद, मका पिकांच्या पेरणीसाठी या वाणांची शिफारस

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने केली या तूर, मुग, भुईमूग, उडीद, मका पिकांच्या पेरणीसाठी या वाणांची शिफारस

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मराठवाड्यात पूर्वमशागतीचा शेवटचा टप्पा संपत आला असून शेतकरी खरीप पिकांच्या वेगवेगळया बियाणांची जमवाजमव करत आहेत. दरम्यान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने खरीप पिकांच्या या वाणांची शिफारस केली आहे.

मराठवाड्यात ४ जूनपासून पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची हजेरी राहणार असून शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी याविषयी संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. कापूस बियाणांच्या वाणांसाठी शेतकरी आक्रमक झाले असताना शेतकऱ्यांना एकूणच खरीप वाणांच्या निवडीसंदर्भात परभणी कृषी विद्यापीठाने शिफारशी केल्या आहेत.

खरीपाच्या पाच पिकांसाठी करा या वाणांची निवड

कापूस  पिकाच्या लागवडीसाठी वाण  निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू  किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा  विचार करून वाणांची निवड करावी.

तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716,  बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811, पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा.

मुग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा.

उडीद  लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा.

भुईमूग  पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123  इत्यादी वाणांचा वापर करावा.

मका  पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.

Web Title: Kharif sowing: As Kharif season begins, select these varieties for 5 crops including cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.