यंदा पावसाचे शुभवर्तमान व वेळेआधी आगमन होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअगोदरच शेतकरी धूळ पेरणी करतो. पेण तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धुळपेरणीचे असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे.
बी बियाणे, खतांची जमवाजमव सुरू केली आहे. पेण तालुक्यात एकूण १३ हजार १०० हेक्टर कृषी क्षेत्र आहे. यापैकी १२ हजार ८०० क्षेत्र लागवडीखाली आहे.
खरिपाची बेगमी आणि शेतीच्या कामांवर अखेरचा हात अशी सध्या लगबग शिवारात आहे. खते, तणनाशके, इतर घरगुती आगोटीचे सामान आणि सुधारीत बी बियाणांची खरेदीसाठी शेतकरी शहराकडे धाव घेत आहेत.
बियाणे, खते गुणवत्तेसाठी कंट्रोल रूम- खरीप हंगाम २०२२ पासून बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रण व पुरवठाबाबत शेतकऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर अडचणी येतात.- या अडचणींचा विचार करून अशा अडचणी गाव पातळीवर सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.- १५ मेपासून हे नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत नियंत्रण कक्षावर तक्रारी करता येणार आहेत. यामुळे फसवणूक झाली तरी या कक्षात तक्रार करता येणार आहे.
अधिक वाचा: BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे