Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या

Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या

Kharif Sowing: Average rainfall in 165 taluks of the state; How many sowing done? | Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या

Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या

राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.

राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यात आतापर्यंत ३३ लाख ८३ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या सुमारे २४ टक्के इतकी आहे. मात्र, पूर्व विदर्भातील चार जिल्हे, नंदुरबार व पालघर जिल्ह्यांमधील १७ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भातील भात लागवडीवर परिणाम झाला आहे.

मान्सून वेळेवर दाखल होऊनही त्या तुलनेत त्याची प्रगती झाली नव्हती. परिणामी, राज्यातील १४६ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच नागपूर विभागात आतापर्यंत केवळ २.७१ टक्के तर, कोकण विभागातही केवळ ३.०९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

राज्यातील २५ ते ५० टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६१, तर ५० ते ७५ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६८ इतकी आहे. ७५ ते १०० टक्के पाऊस ५३ तालुक्यांमध्ये झाला आहे.

शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले तालुके
रत्नागिरी १
नाशिक ८
धुळे १
जळगाव ८
नगर १३
पुणे ८ 
सोलापूर ११
सातारा ९
सांगली १०
कोल्हापूर ३
संभाजीनगर ९
जालना ८
बीड ११
लातूर १०
धाराशिव ८
नांदेड ५
परभणी ८
हिंगोली १
बुलढाणा ९
अकोला २
वाशिम ३
अमरावती ३
यवतमाळ ४
नागपूर १
चंद्रपूर २

मान्सूनने गुरुवारी पूर्व विदर्भात भागात वाटचाल सुरू केली आहे. या आठवडाभरात पेरण्यांमध्ये वाढ होईल. - विनयकुमार आवटे, विस्तार व प्रशिक्षण संचालक

अधिक वाचा: Maka Lagavd मका लागवड करताय? लवकर पक्व होणारे वाण कोणते

Web Title: Kharif Sowing: Average rainfall in 165 taluks of the state; How many sowing done?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.