Join us

Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 9:48 AM

राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.

पुणे : राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यात आतापर्यंत ३३ लाख ८३ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या सुमारे २४ टक्के इतकी आहे. मात्र, पूर्व विदर्भातील चार जिल्हे, नंदुरबार व पालघर जिल्ह्यांमधील १७ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भातील भात लागवडीवर परिणाम झाला आहे.

मान्सून वेळेवर दाखल होऊनही त्या तुलनेत त्याची प्रगती झाली नव्हती. परिणामी, राज्यातील १४६ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच नागपूर विभागात आतापर्यंत केवळ २.७१ टक्के तर, कोकण विभागातही केवळ ३.०९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

राज्यातील २५ ते ५० टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६१, तर ५० ते ७५ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६८ इतकी आहे. ७५ ते १०० टक्के पाऊस ५३ तालुक्यांमध्ये झाला आहे.

शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले तालुकेरत्नागिरी १नाशिक ८धुळे १जळगाव ८नगर १३पुणे ८ सोलापूर ११सातारा ९सांगली १०कोल्हापूर ३संभाजीनगर ९जालना ८बीड ११लातूर १०धाराशिव ८नांदेड ५परभणी ८हिंगोली १बुलढाणा ९अकोला २वाशिम ३अमरावती ३यवतमाळ ४नागपूर १चंद्रपूर २

मान्सूनने गुरुवारी पूर्व विदर्भात भागात वाटचाल सुरू केली आहे. या आठवडाभरात पेरण्यांमध्ये वाढ होईल. - विनयकुमार आवटे, विस्तार व प्रशिक्षण संचालक

अधिक वाचा: Maka Lagavd मका लागवड करताय? लवकर पक्व होणारे वाण कोणते

टॅग्स :खरीपपेरणीपाऊसमोसमी पाऊसपीकशेतकरीशेती