Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा

Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा

Kharif Sowing; Farmers, don't rush sowing.. Sow only after 100 mm of rain | Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा

Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा

अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. घाईगडबड आणि बोगस बियाणे व खतांमुळेही शेतकऱ्यांना फटका बसतो.

अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. घाईगडबड आणि बोगस बियाणे व खतांमुळेही शेतकऱ्यांना फटका बसतो.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. घाईगडबड आणि बोगस बियाणे व खतांमुळेही शेतकऱ्यांना फटका बसतो, पेरा वाया गेला तर काही वेळा हंगाम वाया जातो. त्यामुळे पेरणी करताना शेतकऱ्यांनी जागरूकता दाखविली तरच चांगले उत्पादन मिळू शकते.

उसाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख असली तरी खरीप हंगामात भात, सोयाबीन, भुईमूग, नागली, ज्वारीसह कडधान्य मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा खरिपाचे १ लाख ९२ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र आहे.

मान्सून वेळेवर सुरू होणार म्हणून अगोदरच हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याने भाताच्या धूळ वाफ पेरण्या बऱ्यापैकी संपत आल्या आहेत, आतापर्यंत ५८६० हेक्टर भाताच्या धूळ वाफ पेरण्यात पूर्ण झाल्या आहेत. मान्सून आला म्हणून शेतकरी गडबडीने पेरणी करतात.

जून महिन्यात पाऊस तसा बेभरवशाचा असतो. त्यामुळे पावसाचा अंदाज बघूनच खरिपाची पेरणी केली पाहिजे. जिल्ह्यात पश्चिमेकडील तालुक्यांत भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. डोंगराळ भाग असल्याने पावसाचे प्रमाणे खूपच असते. यामध्ये तग धरणारे पीक म्हणून भात लागवड केली जाते.

येथे २५ टक्के धूळ वाफ पेरणी केली जाते, उर्वरित रोप लावणी असते. त्यामुळे, साधारणतः मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप मशागतीला सुरुवात होते. ३० मे पर्यंत धूळवाफ पेरणी केली जाते. पण, पाऊस चांगला झाला तरच १०० टक्के उगवण होते.

शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्यांत सोयाबीन, भुईमुगाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागात तुलनेत पाऊस कमी असल्याने सोयाबीन, भुईमुगासह कडधान्याची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून केली जाते.

यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असली तरी अद्याप त्याने गती पकडलेली नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड न करता अंदाज बघून पेरणी करावी.

१०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा
पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करू नये. पाऊस किमान १०० मिलिमीटर झाल्यानंतरच बियाण्याची पेरणी करावी. पेरणी करताना जमिनीत किमान सहा इंच ओल असणे गरजेचे असते. तरच, उगवण चांगल्या प्रकारे होते.

पेरणी करण्यापूर्वी ही काळजी घ्या
● शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करताना जमिनीतील ओलावा किती आहे हे पाहावं, नंतरच सुरुवात करावी, वाणाची निवड करून प्रत्यक्ष पेरणी करताना बियाणे दोन ते तीन सेंमीपेक्षा जास्त खाली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
● बियाणे अधिक खोल गेल्यास पाऊस जोराचा आला तर त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्याचबरोबर पेरणी करताना पिकांची निवड आणि पेरणीचा काळ याचंही नियोजन करणं गरजेचं आहे.
● यामध्ये कमी काळाची पिके सुरुवातीला पेरली गेली पाहिजेत. यात मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आहे, तर दीर्घकालीन पिकांमध्ये कापूस, तूर अशी पिके आहेत. ती थोडी उशिरा पेरली तरी चालू शकतात.

बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या
• बियाणे खरेदी करताना स्थानिक वातावरणास योग्य असलेले बियाणे खरेदी करावे.
• कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच बियाण्याची निवड करावी.
• जमिनीच्या पोतानुसार जास्त उत्पादन देणारे बियाणे निवडावे.
• बियाणे नेहमी परवानाधारक कृषी केंद्र विक्रेत्याकडूनच घ्यावे.
• बियाणे खरेदी करताना अधिकृत बिल घ्यावे.
• बिलात पीक, वाण लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे पूर्ण नाव नमूद असावे.

दृष्टिक्षेपात कोल्हापूर क्षेत्र (हेक्टरमध्ये)
• भौगोलिक क्षेत्र: ७ लाख ७६ हजार
• लागवडी लायक : ५ लाख ७ हजार
• निव्वळ पेरा : ४ लाख ७७ हजार
• खरीप : १ लाख ९२ हजार ६३६
• रब्बी : २१ हजार ७
• ऊस : १ लाख ८८ हजार ४५९

बोगसगिरीवर भरारी पथकाचा वॉच
बोगस बियाणे व खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून कृषी विभागाच्या वतीने चौदा भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके कोणत्याही बियाणे, खते विकी केंद्रांना भेट देऊन तपासणी करीत आहे.

मान्सूनचे आगमन झाले असले तरी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये. पाऊस चांगला झाल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्यासंह खतांबाबत काही तक्रारी असतील तर कृषी विभागाशी संपर्क साधावा. - अरुण भिंगारदेवे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कोल्हापूर)

अधिक वाचा: Soybean Cultivation आता कोकणातही सोयाबीन लागवड होईल शक्य, कसे कराल व्यवस्थापन

Web Title: Kharif Sowing; Farmers, don't rush sowing.. Sow only after 100 mm of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.