Join us

देशात ७३३ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या; ऊस, तेलबियांचे क्षेत्र वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 4:52 PM

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 21 जुलै 2023 पर्यंतची  खरीप पिकांची  क्षेत्र व्याप्तीची प्रगती जाहीर केली आहे.

मॉन्सूनचा पाऊस संपूर्ण देशात पोहोचला असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. महाराष्ट्रातही कोकण, मराठवाड्यातील नांदेडचा भाग, विदर्भातील काही भाग आणि ठाणे जिल्ह्यासह, घाट परिसरातील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली, तर अनेक ठिकाणी आजही पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने २१ जुलै २०२३ पर्यंतची  खरीप पिकांची क्षेत्र व्याप्तीची प्रगती जाहीर केली आहे. 

राज्यात ७७% पावसानंतर खरिपाच्या किती पेरण्या झाल्या ? माहितीसाठी क्लिक करा

केंद्राने जाहीर केलेल्या या अहवालात देशात मागील वर्षाच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा काही पीकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यात भाताचे क्षेत्र जवळपास ८ लाख हेक्टरने, तर ऊसाचे ३ लाख हेक्टरने वाढले आहे. कपाशीचे क्षेत्र मात्र मागच्या वर्षीप्रमाणेच जवळपास असून तृणधान्यांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यातही बाजरीचे क्षेत्र ५ लाख हेक्टरने वाढले आहे.  तेलबियांच्या क्षेत्रातही जवळपास ५लाख हेक्टरची वाढ असून त्यात सोयाबीनचे क्षेत्र ३ लाक हेक्टरने वाढले आहे.

(क्षेत्र :लाख हेक्टरमध्ये)

अ.क्र.

पिक

एकूण पेरा

 

1

 

भात

चालू हंगाम 2023

180.20

मागील हंगाम २०२२

175.47

2

डाळी

85.85

95.22

a

तूर

27.20

33.33

b

उडीद

22.91

25.36

c

मुग

26.12

26.67

d

कुळीथ

0.18

0.15

e

इतर डाळी

9.44

9.72

3

श्रीअन्न- तृणधान्य

134.91

128.75

a

ज्वारी

10.07

9.72

b

बाजरी

57.99

52.11

c

नाचणी

1.69

1.67

d

इतर तृणधान्य

2.17

2.36

e

मका

63.00

62.89

4

तेलबिया

160.41

155.29

a

भुईमुग

34.94

34.56

b

सोयाबीन

114.48

111.31

c

सूर्यफुल

0.47

1.46

d

तीळ

8.73

7.20

e

नीगर

0.07

0.13

f

एरंडी

1.66

0.53

g

इतर तेलबिया

0.07

0.10

5

ऊस

56.00

53.34

6

ज्यूट

6.36

6.92

7

कापूस

109.69

109.99

एकूण

733.42

724.99

 

टॅग्स :खरीपमोसमी पाऊसपेरणी