Lokmat Agro >शेतशिवार > छत्रपती संभाजीनगरमध्ये खरिपाच्या पेरण्यांना गती, बहुतांश पिकांचा पेरा ५० टक्क्यांपर्यंत, दुबार पेरणीचे संकट टळले

छत्रपती संभाजीनगरमध्ये खरिपाच्या पेरण्यांना गती, बहुतांश पिकांचा पेरा ५० टक्क्यांपर्यंत, दुबार पेरणीचे संकट टळले

Kharipa sowing accelerated in Chhatrapati Sambhajinagar, sowing of most crops up to 50%, crisis of double sowing averted | छत्रपती संभाजीनगरमध्ये खरिपाच्या पेरण्यांना गती, बहुतांश पिकांचा पेरा ५० टक्क्यांपर्यंत, दुबार पेरणीचे संकट टळले

छत्रपती संभाजीनगरमध्ये खरिपाच्या पेरण्यांना गती, बहुतांश पिकांचा पेरा ५० टक्क्यांपर्यंत, दुबार पेरणीचे संकट टळले

यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने जुलैचा पंधरवडा उलटला तरी हवा तसा  पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दोन ...

यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने जुलैचा पंधरवडा उलटला तरी हवा तसा  पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दोन ...

शेअर :

Join us
Join usNext

यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने जुलैचा पंधरवडा उलटला तरी हवा तसा  पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दोन दिवसातील पावसामुळे पेरण्याचे मळभ दूर होत असून खरीप हंगामातील पेरण्यांना गती येऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारी, १८ जुलैपर्यंत  ८६.२ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या. कापूस, तेलबिया आणि तृणधान्यांच्या  लागवडीला वेग आला आहे. ज्वारी, बाजरी, तीळ, नाचणी या पिकांचा पेरा संथ गतीने सुरु आहे.  

जिल्ह्यात सोयाबीनची १७८.९४ टक्के पेरणी झाली असून उसाचे १०४. १ टक्के गाळप झाले आहे.  ज्वारी, बाजरी, तीळ पिकांच्या पेरण्या सोडल्यास बहुतांश पिकांच्या  ५० टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या आहेत.  यंदा ६ लाख ७ हजार १३५. ५४ हेक्टर क्षेत्रावर  पेरण्या झाल्या आहेत. 

ज्वारीची सरासरी १३४३.६ हेक्‍टरवर पेरणी होणे आवश्यक होते परंतु प्रत्यक्ष पेरणी ४२८. २१ हेक्टर वरच म्हणजे ३१.८७% पेरणी झाली आहे. ३३७९३.१ हेक्टरवर एकूण कडधान्य पेरणी झाली असून जिल्ह्यात ६०% कडधान्यांची पेरणी पूर्ण झाली आहे. तुर ६६%, मूग ५१%, उडीद ४५%, भुईमूग ६१% तर मक्याचे ९१% पेरणी झाली आहे.

 १ जुलै ते १८ जुलै दरम्यान औरंगाबाद विभागात १७२. मि. मि पाऊस पडला.  तसेच पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजाला दुबार पेरणीचे संकट नाही. 

  "दरवर्षी जूनच्या पंधरवड्यात होणाऱ्या पेरण्या यंदा लांबल्याचे  चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात  काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवेल अशी चिंता असली तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये  दुबार पेरणीचे चित्र नाही." असे जिल्हा कृषी अधीक्षक पी.आर. देशमुख यांनी सांगितले. 

 तालुकानिहाय  पाऊस 

१८ जुलै पर्यंत  (मिमी)

औरंगाबाद  १८०.३
पैठण          १७८.०
गंगापूर        २०२.५
वैजापूर        १८२.९
कन्नड          १७९.५
खुलताबाद   २०९.९
सिल्लोड       १६७.१
सोयगाव       २१९.०
फुलंब्री          १८२.१

 

Web Title: Kharipa sowing accelerated in Chhatrapati Sambhajinagar, sowing of most crops up to 50%, crisis of double sowing averted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.