Lokmat Agro >शेतशिवार > किसान कृषी प्रदर्शन आजपासून सुरु; शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

किसान कृषी प्रदर्शन आजपासून सुरु; शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

Kisan Agriculture Exhibition Starts Today; Huge response from farmers | किसान कृषी प्रदर्शन आजपासून सुरु; शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

किसान कृषी प्रदर्शन आजपासून सुरु; शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन 'किसान' १३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित होत आहे. आजपासून प्रदर्शनाला सुरवात झाली आहे.

भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन 'किसान' १३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित होत आहे. आजपासून प्रदर्शनाला सुरवात झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन 'किसान' १३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित होत आहे. आजपासून प्रदर्शनाला सुरवात झाली आहे.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
-
किसानच्या मालिकेतील ३२ वे प्रदर्शन
- प्रदर्शन वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत
- ५०० पेक्षा अधिक प्रदर्शक
- भारतभरातील १००,०००+ शेतकरी व उद्योजक
- ऑनलाईन नोंदणीला प्रचंड प्रतिसाद
- मोबाईल ॲपवर प्रदर्शक, त्यांची उत्पादने व सेवांची माहिती 
 
१५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, ५ दिवसांमध्ये  देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. किसान प्रदर्शनाला शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. 
 
मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील. प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी स्पार्क या दालनाचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान व नाव कल्पनांना चालना देण्यात येईल. 

पूर्वनोंदणी
प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. ३०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.

प्रदर्शकांची माहिती व संपर्क
किसान मोबाईल ॲपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती उपलब्ध आहे. नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा प्रदर्शक संस्थांशी संवाद प्रदर्शनाच्या आधीपासूनच सुरु झाला आहे.

स्थळ
किसान प्रदर्शनाचे आयोजन पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र येथे करण्यात आले असून प्रदर्शन मैदानाची देखभाल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (पीएमआरडीए) करण्यात आली आहे.

किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क
www.kisan.in

Web Title: Kisan Agriculture Exhibition Starts Today; Huge response from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.