हिवाळ्यात शरीराला गरजेची ऊर्जा देणारं तृणधान्य म्हणून घरातील जेवणामध्ये हमखास तीळाचा वापर आवर्जून केला जातो. रक्तातील हिमोग्लोबीन वाढवायचे असेल तर एक तीळाची वडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
संक्रातीदिवशी तसं या तीळाचं महत्व अधिक असलं तरी हिवाळ्यात किंवा थंडीत तिळाच्या सेवनाला विशेष महत्व आहे. आयुर्वेदात बलवर्धक असल्याचे अनेक उदाहरणे सापडतात. छोट्याशा तीळाच्या दाण्यात अनेक गुणधर्म असतात. रक्तातील हिमोग्लोबीन वाढवायचं असेल तर तीळाच्या वडीचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
१०० ग्रॅम तीळाच्या वडीत काय गुणधर्म असतात?
लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
तिळाचे अनेक फायदे
उष्ण गुणधर्मांमुळे तीळ थंडीमध्ये शरीरात ऊर्जेसाठी खास खाल्ला जातो. मधुमेह व उच्च रक्तदाबावर तीळ गुणकारी असल्याचे सांगितले जाते. लोहाचं प्रमाण अधिक असल्यानं हाडांसाठीही तीळ चांगले आहेत.