अशी आहे पद्धत कम्पोस्ट खत निर्मितीसाठी खड्डा १ मीटर खोल, २ मीटर रुंद आणि ३ मीटर लांब असा असावा. असे खड्डे शेतात सुद्धा २ एकराला १ खड्डा या प्रमाणात करता येतील . खड्ड्याला काढलेल्या मातीचा बांध घालावा. खड्डा शेतात शक्यतो उंच भागात असावा. खड्डा भरताना..१. खड्डा भरताना शेतातील काडी कचरा लहान आकारात तुकडे करून पहिल्या दिवशी खालचा थर भरावा. त्यावर १ किलो युरिया , २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो शेणकाला शिंपडावे .२. दुस-या दिवशी दुसरा थर भरून त्यावर सुद्धा १ किलो युरिया , २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो शेणकाला शिंपडावे .३. तिस-या दिवशी तिसरा थर भरून त्यावर सुद्धा १ किलो युरिया , २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो शेणकाला शिंपडावे. कम्पोस्ट कल्चर मिळाल्यास वापरावे किंवा जुने चांगले कुजलेले खत थोडे विरजण सारखे टाकावे. त्यावर शेवटी आच्छादन करून खड्डा मातीने बंद करावा. ४. एक महिन्याने खड्ड्यातील सर्व काडीकचरा चांगला मिसळून घ्यावा आणि खड्डा परत बंद करावा. ५. दोन महिन्याने पुन्हा एकदा खड्ड्यातील सर्व काडीकचरा चांगला मिसळून घ्यावा आणि खड्डा परत बंद करावा.
आणि खत तयार आहेतिस-या महिन्यात ९० दिवसानंतर खड्ड्यातील तापमान तपासावे, उष्ण असल्यास कुजण्याची प्रक्रिया सुरू आहे असे समजावे आणि खड्डा तसाच राहू द्यावा. पुन्हा १० दिवसाच्या अंतराने उष्णतामान तपासावे. ज्या वेळी ते थंड असल्याचे लक्षात येईल तेव्हा खत पूर्णपणे कुजले आहे असे समजावे. असे कुजलेले खत शेतात वापरण्या साठी हरकत नाही.-कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली