Join us

साखर उत्पादनात कोल्हापूरच आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 1:20 PM

राज्यात ऊस गाळपाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले असून, या कालावधीत ४ कोटी ३९ लाख ३६ हजार टनांचे गाळप झाले आहे. गाळपात अद्याप पुणे विभाग पुढे असला तरी साखर उत्पादनात मात्र कोल्हापूर आघाडीवर राहिला आहे.

कोल्हापूर : राज्यात ऊस गाळपाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले असून, या कालावधीत ४ कोटी ३९ लाख ३६ हजार टनांचे गाळप झाले आहे. गाळपात अद्याप पुणे विभाग पुढे असला तरी साखर उत्पादनात मात्र कोल्हापूर आघाडीवर राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात ८३ लाख टनांनी उसाचे उत्पादन घटले असून, यंदा सरासरी गाठणेसुद्धा कारखान्यांना अवघड होणार आहे.

पावसाने पाठ फिरवली, उसाची वाढ खुंटली• पावसाने पाठ फिरविल्याने उसाची वाढ झाली नाही. ऊसदराच्या आंदोलनामुळे हंगाम महिनाभर उशिरा सुरु झाला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसते.• राज्यात ९७ सहकारी व १०० खासगी, अशा १९७ कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. त्यांनी ४ कोटी ८३ लाख टनांचे गाळप केले असून, त्यातून ४ कोटी ३९ लाख ८६ हजार क्विंटल साखर उत्पादित झाली.• गत हंगामात याच काळात २०२ कारखान्यांनी ५ कोटी ६६ लाख ९७ हजार टनांचे गाळप करून ५ कोटी ३६ लाख ५४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. कारखान्यांची गाळपाची गती पाहता, हंगामाची सरासरी गाठताना यंदा कारखान्यांची दमछाक होणार आहे.

अधिक वाचा: एकरी जास्त टन ऊस घ्यायचाय? मग क्षारपड जमिनीवर तातडीने हा उपाय कराच

विभागनिहाय उसाचे गाळप व साखर उतारा टक्केवारीत

विभागगाळप टनउतारा
कोल्हापूर१०३.६६ लाख१०.४२
पुणे१०५.७७ लाख९.३५
सोलापूर१०५.१५ लाख८.३८
अहमदनगर६२.१२ लाख८.८९
छ. संभाजीनगर४६.२१ लाख७.८०
नांदेड५४.८८ लाख९.०१
अमरावती४.२ लाख८.७९
नागपूर१.२१ लाख३.४७

 

टॅग्स :ऊससाखर कारखानेपीककोल्हापूर