Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील कृषी सेवा केंद्र २ नोव्हेंबरपासून राहणार बंद; प्रस्तावित कायदा रद्दची मागणी

राज्यातील कृषी सेवा केंद्र २ नोव्हेंबरपासून राहणार बंद; प्रस्तावित कायदा रद्दची मागणी

Krishi Seva Kendra in Maharashtra will closed for 3 days from 2 to 4 November | राज्यातील कृषी सेवा केंद्र २ नोव्हेंबरपासून राहणार बंद; प्रस्तावित कायदा रद्दची मागणी

राज्यातील कृषी सेवा केंद्र २ नोव्हेंबरपासून राहणार बंद; प्रस्तावित कायदा रद्दची मागणी

नोव्हेंबरच्या २ तारखेपासून ४ तारखेपर्यंत राज्यातील कृषी सेवा केंद्र आपल्या मागण्यांसाठी बंद पाळणार आहेत. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचण सहन करावी लागणार आहे.

नोव्हेंबरच्या २ तारखेपासून ४ तारखेपर्यंत राज्यातील कृषी सेवा केंद्र आपल्या मागण्यांसाठी बंद पाळणार आहेत. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचण सहन करावी लागणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयक क्र ४०.४१,४२,४३ व ४४ मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र ऐन रब्बी हंगामात येत्या गुरुवारी दि २ नोव्हेंबर ते शनिवारी ४ नोव्हेंबर असा ३ दिवसांचा बंद पाळून राज्य शासनाच्या या कायद्याचा निषेध नोंदवणार आहे.

या संदर्भात महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोशिएशन (माफदा) यांनी वेळोवेळी कृषी सचिव,कृषी आयुक्त,तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते.तसेच प्रत्यक्ष बैठकीतही या संदर्भात निवेदन केले होते. यावेळी संबंधित कायद्यातील जाचक नियमांमुळे होणारे संभाव्य नुकसान व धोके तसेच संपूर्ण व्यापारावर होणारे विपरीत परिणाम, तसेच एकंदरीत शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली गेली.

मात्र बैठकीत यावर समाधान कारक तोडगा न निघाल्यामुळे ३ दिवसांच्या बंदचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती असोशिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, राज्य अध्यक्ष विनोद तराळ पाटील, राज्य सचिव विपिन कासलीवाल यांनी दिली.त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र येत्या २ ,३ व ४ नोव्हेंबर रोजी बंद राहणार असल्याने कळविण्यात आले आहे.

Web Title: Krishi Seva Kendra in Maharashtra will closed for 3 days from 2 to 4 November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.