ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे ४५ दिवशीय ॲग्री-क्लिनिक्स आणि ॲग्री-बिझनेस हे उद्योजकता विकास प्रशिक्षण राष्ट्रीय कृषि विस्तार प्रबंध संस्थान (मॅनेज) हैदराबाद या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ पासून राबविण्यात येते.
आतापर्यंत केंद्रामध्ये ॲग्री-क्लिनिक्स आणि ॲग्री-बिझनेस या प्रशिक्षणाच्या ४१ बॅचेस पूर्ण करण्यात आल्या असून एकून १२७४ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी ६२४ पेक्षा जास्त प्रशिक्षनार्थींनी स्वतःचे कृषिपूरक व्यवसाय सुरु केले आहेत. कृषि विज्ञान केंद्रामार्फत ॲग्री-क्लिनिक्स आणि ॲग्री-बिझनेस हे प्रशिक्षण घेतलेल्या ८१ विद्यार्थ्यांच्या कृषिपूरक व्यवसाय सुरु केलेल्या यशोगाथा डिसेंबर २०२२ या महिन्यात मॅनेज हैदराबाद या संस्थेला पाठविण्यात आल्या होत्या.
सन २०२२ साठी सर्वोत्कृष्ट नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून केंद्राची निवड केली होती आणि १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मॅनेज हैदराबाद या संस्थेचे महासंचालक डॉ. पी. चंद्रशेकरा व मुख्य समन्वयक डॉ. शहाजी फंड यांच्या हस्ते केंद्राचे प्रतिनिधी व नोडल अधिकारी डॉ. रतन जाधव यांना मॅनेज हैदराबाद येथे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून श्री. गणेश शिंदे व श्री. संतोष गोडसे यांनी काम पाहिले.
संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्रदादा पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे आणि केंद्रप्रमुख डॉ. धीरज शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.