आपल्या प्रत्येकाच्या दारात तुळशीचे झाड असते. तुळशीचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात हे सर्वांनाच माहिती आहे पण तुळशीचा उपयोग शेतीसाठीसुद्ध होतो हे आपल्याला माहिती आहे का? शेती करत असताना मालाच्या उत्पादन वाढीसाठी तुळशीचा उपयोग केला जाऊ शकतो.
कृष्णतुळस ही मुळातच आयुर्वेदिक गुणधर्म असलेली वनस्पती आहे म्हणून तिला प्रत्येकाच्या दारासमोर असते. तिचा छान वासही परिसरात दरवळत असतो. हाच वास शेतीमध्ये पिकांसाठी हानीकारक असलेल्या कीडे आणि किटकांसाठी फायद्याचा ठरतो.
तुळशीच्या झाडांमध्ये रोगांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती असते. अनेक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर तुळशीचे रोपे आढळतात. तुळशीच्या वासामुळे कीड नियंत्रण करता येते. तर शेतीवर येणाऱ्या कीडरोगावर तुळशीमुळे नियंत्रण करता येते.
तुळशीची शेतीही करता येतेसौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधे आणि इतर वस्तू बनवण्यासाठी तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे तुळशीला बाजारपेठेत मोठी मागणी असून तुळशीची व्यवसायिक पद्धतीने शेती करता येते. तुळशीमध्ये वेगवेगळ्या जाती असून या वनस्पतीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन होऊ शकते.