Join us

Ladki Bahin Yojana : राज्यातील कोटींच्यावर लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर; लाखो बहिणींचे आधार संलग्नला लागतोय वेळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 12:29 PM

लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नाही त्यासाठी आता अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधावा. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana :

पुणे : लाडकी बहीण योजनेसाठी अखेरच्या दिवसापर्यंत २ कोटी ५२ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. २३ लाख ४० हजार महिलांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने १५०० रुपयांचा लाभ मिळाला नाही. 

त्यांच्या घरी जाऊन आधार संलग्न करण्याच्या सूचना महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिल्या. महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

३० सप्टेंबरअखेर २ कोटी ४१ लाख ३५ हजार ६५७ अर्जाना मान्यता देण्यात आली असून, ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी संलग्न नाही त्यांना आधार जोडण्याच्या सूचना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या घरी पाठवा, अशी सूचना तटकरे यांनी केली.

राज्यातील जिल्हानिहाय अर्ज आणि मंजूर अर्ज 

जिल्हा अर्जमंजूर अर्ज
नगर११९००४३११४६२०८
संभाजीनगर९६२६४०९३८८७२
धाराशिव      ४०२१४७३८१८८१
धुळे ५००७८३४८२५१०
गडचिरोली२५९४४२२५२४१८
गोंदिया३६००३६३५१७६८
हिंगोली ३१२९२८३००२७६
जळगाव९१४७७३९६३८६१
जालना५१९२९३४८७४९३
कोल्हापूर १०१८८२४१००१५५३
लातूर ५६६३६९५४२६५३
मुंबई शहर४३०५९७३८३७८५
मुं. उपनगर१०६३७५७९७७३३८
नागपूर१०६४२७८१०२६३२८
नांदेड८४१४४२८००५४४
नंदुरबार४१९०८६४०६८३१
नाशिक१४८६४१३१४३५६६७
पालघर६११२६३५२३६४५
परभणी४४९९३६ ४३०६१३
पुणे१९८६५८६१९०६०२३
रायगड५९९६१४ ५८२०४०
रत्नागिरी४१३१६७३९५७९२
सांगली७४६४०८७१८९१८
सातारा८०९००२४८७४९३
सिंधुदुर्ग२०५१८५१९४४८०
सोलापूर    १०६३६६३१००७८७९
ठाणे  १३.६६,७५९१२९६४०२
वाशिम  ३१५८५६७०२३७७
वर्धा३१४३०२३०२७६४
यवतमाळ७०२३७७६८२२२४
एकूण राज्य२५२०१९७५२४१३५६५७
टॅग्स :शेती क्षेत्रलाडकी बहीण योजनेचासरकारी योजनामहिलापैसा