Lokmat Agro >शेतशिवार > Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत हे करा मिळतील पैसे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत हे करा मिळतील पैसे

Ladki Bahin Yojana : Ladki Bahin Yojana form has been filled but money has not been received Do this for getting money | Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत हे करा मिळतील पैसे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत हे करा मिळतील पैसे

राज्य शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर १४ ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे.

राज्य शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर १४ ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्य शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर १४ ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे. जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे बहुतांश महिलांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. नातेवाइक, मैत्रिणी तसेच शेजारीणीच्या खात्यावर पैसे आले.

पण, माझ्या खात्यावर पैसे नाही आले, अशा तक्रारी घेऊन महिला सेतू केंद्र, बँकेत गर्दी करत आहेत. पैसे न येण्याचे सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे बैंक खाते आधारशी लिंक नसणे. त्यामुळे प्रथम अर्जदार महिलांना आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यावे लागणार आहे.

राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर बहुतांश महिलांनी घाईगडबडीत अर्ज केला. योजनेंतर्गत पैसे येणार की नाहीत, असा संभ्रम असल्याने काही महिलांनी प्रथम याकडे दुर्लक्ष केले.

मात्र, ज्यांनी अर्ज केला, त्यांच्या खात्यावर पैसे येण्यास प्रारंभ झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी गर्दी वाढली. ज्यांनी अर्ज केले होते, त्यांना छाननीनंतर काही दिवसांत अॅप्रूव्ह असा मेसेज आला होता.

ज्यांचे वय बसत नाही, त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते, तर आधारकार्ड आणि अर्जातील नावात बदल, बँक पासबुकवरील खाते क्रमांक अस्पष्ट दिसणे, अशा अर्जदारांना अटी पूर्ततेसाठी संधी देण्यात आली होती.

अर्ज मंजुरीनंतरही प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे वर्ग होण्यासाठी आधार बँकेशी लिंक असणे गरजेचे होते. त्यामुळे बँकेशी आधार लिंक झाल्यानंतर अर्ज मंजूर असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

आधार लिंक असलेल्या दुसऱ्याच बँक खात्यावर पैसे
१) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करताना बैंक खाते क्रमांक टाकून पासबुक अॅपलोड केले. मात्र, हे बँक खाते आधारशी लिक नव्हते, तर अन्य बँक खाते आधारशी लिंक होते.
२) त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर आपले आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हे
तपासून घ्यावे.

पैसे आले नाहीत हे करा
-
बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.
- तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले 'बँक सिडिंग' स्टेटस चेक करावे.
- आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्यावे.
- त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.
- बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- वरील वेबसाईटवर आधारकार्ड नंबर टाकून कॅपच्या टाकून लॉगीन करा व आधार सिडिंग स्टेटस मध्ये जाऊन आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता येईल.

Web Title: Ladki Bahin Yojana : Ladki Bahin Yojana form has been filled but money has not been received Do this for getting money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.