Join us

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत? काय आहेत कारणं वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:33 PM

लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती त्याला मुदतवाढ देवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. यातून शिल्लक महिलांचे पुढे काय? याविषयी अनेक प्रश्न आहेत.

लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती त्याला मुदतवाढ देवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. यातून शिल्लक महिलांचे पुढे काय? याविषयी अनेक प्रश्न आहेत.

तसेच नोंदणी करूनही अजूनही काही महिलांना पैसे आलेले नाहीत. त्यामुळे महिला हवालदिल झाल्या आहेत. या विषयी महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.• या योजनेला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेची दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणून तीन हजार रुपये दिले आहेत. अनेक महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत.• परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत व त्याचप्रमाणे ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरले त्यांना पैसे कधी मिळणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण होते.

बँकेचे जॉइंट खाते असल्यास अर्ज रद्द- योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर ठेवली होती आणि या कालावधीमध्ये दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. अनेक महिला आहेत ज्यांनी योजनेसाठी अर्ज करू शकल्या नाही.- योजनेच्या लाभासाठी व्यक्तिगत बँक पासबुक सादर करावे लागेल, जर तुम्ही अर्ज करताना जॉइंट खाते दिले आहे तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो किंवा तुम्हाला पैसा मिळणार नाही त्यासाठी तुमचे स्वतंत्र बँक खाते उघडून घ्यावे.

अर्ज मंजूर; पण पैसे का जमा झाले नाहीत?अनेक महिलांनी जुलै, ऑगस्टमध्ये अर्ज सादर केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले, परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळाला नाही, अशा महिला असल्याची शक्यता आहे. ladki bahin yojana bank aadhar seeding त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तर त्यांना या योजनेचा पैसा मिळणार नाही. त्यासाठी महिलांना आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे लागेल.

टॅग्स :लाडकी बहीण योजनेचामहाराष्ट्रसरकारसरकारी योजनाराज्य सरकारमहिलाबँकआधार कार्ड